भारत सध्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्यासाठी संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या कार्यक्रमांमध्ये देशातील प्रत्येक नागरिकाला सामावून घेण्यात येत आहे. याच अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आता केंद्र सरकारकडून हर घर तिरंगा ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेनुसार देशातील प्रत्येकाला आपल्या घरात आपला राष्ट्रध्वज तिरंगा फडकवता येणार आहे.
आपल्या देशाचा राष्ट्रध्वज आता घरोघरी फडकवता येणार असल्याने ही प्रत्येकासाठी एक गौरवाचीच बाब आहे. पण राष्ट्रध्वजासोबत त्याचा मान उंचावणं आणि तो अबाधित राखणं ही देखील प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. त्यामुळे ध्वजाचा आकार कसा असावा हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे.
(हेही वाचा – Har Ghar Tiranga: आता दिवस-रात्र ‘तिरंगा’ फडकणार! ध्वज संहितेत मोठा बदल)
१३ ते १५ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ मोहीम
यंदा देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारकडून १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ (प्रत्येक घरात ध्वजारोहण) मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत प्रत्येक भारतीयाला घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. भारतीय ध्वज संहिता २००२ नुसार, राष्ट्रध्वज कसा असला पाहिजे, याबाबत नियम सांगण्यात आले आहेत. अलीकडेच या नियमात बदल देखील करण्यात आले आहेत.
असे आहेत नियम
- राष्ट्रीय ध्वज तिरंगी आयताकृती असून त्यात सारख्या रूंदीचे ३ आयताकृती पट्टे किंवा उपपट्टे असावेत.
- राष्ट्रध्वज हाताने शिवलेला आणि हाताने विणलेला असावा.
- राष्ट्रध्वजाची लांबी आणि उंची (रूंदी) ही ३:२ असायला हवी.
असा हवा झेंड्याचा आकार
ध्वज संहितेत झालेला बदल
या मोहिमेसाठी ध्वज संहितेत बदल करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व मंत्रालये आणि विभागांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे. या पत्रात असे म्हटले की, भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकवणे आणि त्याचा वापर करणे हे भारतीय ध्वज संहिता २००२ आणि राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा १९७१ द्वारे नियंत्रित आहे. भारतीय ध्वज संहिता, २००२ मध्ये २० जुलै २०२२ च्या आदेशाद्वारे आणखी सुधारणा करण्यात आली आहे आणि भारतीय ध्वज संहिता २००२ च्या भाग-२ च्या परिच्छेद २.२ च्या खंड (११) नुसार आता ओळखले जाणार आहे. ध्वज आता रात्रंदिवस फडकवता येणार आहे. यापूर्वी ऋतू कोणताही असो, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तिरंगा फडकवण्याची परवानगी होती.
भारतीय ध्वज संहिता, २००२ च्या भाग-१ मधील परिच्छेद १.२ आता खालीलप्रमाणे असणार…
- कापूस/पॉलिस्टर/रेशीम खादी बंटिंग यंत्राने बनवलेला असावा.
- पूर्वी मशीनने बनवलेले आणि पॉलिस्टरचे ध्वज वापरण्यास परवानगी नव्हती.