बस प्रवाशांना डिजिटल सेवा, विविध सुविधा पुरवून सुखकर अगदी मिनी इलेक्ट्रिक बसगाड्यांमधून गारेगार प्रवास घडवणाऱ्या परिवहन विभागापाठोपाठ आता बेस्टच्या वीज विभागानेही हरित क्रांतीच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. बेस्ट वीज विभाग, भविष्यात ७०० मेगावॉट हरित ऊर्जेचा वापर केला जाणार आहे.
१० लाख वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा
बेस्ट उपक्रमाच्या कुलाबा येथील मुख्यालयात मंगळवारी, 26 जुलै रोजी ‘बिजली महोत्सव’ आयोजित केला होता. याप्रसंगी, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, एनटीपीसीचे क्षेत्रीय कार्यकारी निदेशक मनीष जोहरी, अदानी कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कपिल शर्मा आणि बेस्टचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना लोकेश चंद्र यांनी बेस्ट उपक्रम सध्या कोट्यवधी रुपयांनी तोट्यात असला तरी बेस्टचा वीज विभाग शहर भागातील आपल्या १० लाख वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करीत आहे. या १० लाख वीज ग्राहकांमध्ये ८ लाख निवासी व २ लाख व्यावसायिक वीज ग्राहक आहेत. मात्र बेस्ट उपक्रम कितीही आर्थिक अडचणीत असला तरी या सर्व वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करते.
(हेही वाचा बाळासाहेबांच्या सूनेने घेतली एकनाथ शिंदेंची भेट)
‘हरित ऊर्जेचा’ वापर करणार
बेस्ट उपक्रम भविष्यात ७०० मेगावॅट ‘हरित ऊर्जेचा’ वापर करणार आहे. तसेच, जर बेस्टच्या दहा लाख वीज ग्राहकांची काही कारणास्तव बत्ती गुल झाल्यास ती कधी येणार, त्याला किती वेळ अंधारात बसावे लागणार याबाबत आता टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण की, बेस्ट स्वतः त्याबाबतची माहिती संदेशाद्वारे ग्राहकांना कळविण्यात येणार असल्याची माहिती लोकेश चंद्र यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community