सर्वोच्च न्यायालयाचे वकील विनीत जिंदल यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. वकिलांच्या घरी एक पत्रक सापडले असून, त्यामध्ये ‘सर तन से जुदा करेंगे’ असे लिहिले आहे. मात्र, हे धमकीचे पत्र कोणी आणि का दिले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विनीत जिंदल यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. विनीत जिंदल यांचा आरोप आहे की, त्यांना यापूर्वीही देश-विदेशातून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत.
धमकीचे पत्र ट्विट करून केले शेअर
विनीत जिंदल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात फेकलेल्या धमकीपत्राचा फोटो टाकून त्यांनी ट्विट केले आणि लिहिले की, ‘आज जिहादींनी माझे डोके फोडण्याची धमकी दिली. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे, याची दिल्ली पोलिसांनी नोंद घ्यावी, असे ट्वीट विनीत जिंदल यांनी केले आहे.
( हेही वाचा: ‘पक्षप्रमुख’ उल्लेख टाळत, एकनाथ शिंदेंनी अशा दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा )
आज जिहादियों ने मेरा भी सर तन से जुदा कर ने की धमकी दी मेरे घर पर भेजा गया ये ।मेरी व मेरे परिवार की जान को ख़तरा हे ये बात पहेले ही दिल्ली पुलिस मन चुकी हे @cp_delhi @DCP_NorthWest से आग्रह हे की इस पर करवाही करे । pic.twitter.com/y8eLYsgpY9
— Adv.Vineet Jindal (@vineetJindal19) July 26, 2022
याआधीही देण्यात आलीय धमकी
विनीत जिंदल यांनी याआधी अजमेर दर्ग्याशी संबंधित खादिम आणि अंजुमन कमिटीचे सचिव आदिल चिश्ती यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. आदिल चिश्ती यांच्याविरुद्ध हिंदू देवदेवतांवर अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी जिंदल यांना आधीच सुरक्षा दिली होती.
Join Our WhatsApp Community