गेल्या २४ वर्षात मुंबईतील रस्ते बनवण्यासाठी बीएमसीने २१,००० कोटींहून अधिक खर्च करूनही मुंबईतील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. मी तुम्हाला विनंती करू इच्छितो की प्रत्येक रस्त्याच्या छोट्या निविदा काढण्यापेक्षा पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे आणि शहरासाठी प्रत्येकी एक, फक्त ३ निविदा काढण्याची BMC ला सूचना द्यावी. जेणेकरून भारत सरकार आणि NHAI सोबत काम करणाच्या मोठ्या पायाभूत सुविधा कंपन्यांनाच निविदेत भाग घेता येईल. यादृष्टीकोनातून निविदेतील अटी असाव्यात अशी मागणी भाजपचे आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुंबई शहरातील रस्ते आणि खड्ड्यांची प्रदीर्घ प्रलंबित समस्या मी तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो जी नियोजन, दूरदृष्टी आणि विचाराच्या अभावामुळे सोडवली गेली नाही. गेल्या २४ वर्षात मुंबईतील रस्ते बनवण्यासाठी बीएमसीने २१,००० कोटींहून अधिक खर्च करूनही मुंबईतील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. मी तुम्हाला विनंती करू इच्छितो की प्रत्येक रस्त्याच्या छोट्या निविदा काढण्यापेक्षा पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे आणि शहरासाठी प्रत्येकी एक, फक्त ३ निविदा काढण्याची BMC ला सूचना द्यावी.
(हेही वाचा – धोकादायक झालेल्या पोलीस वासहतीच्या पुनर्विकासाबाबत सर्वंकष धोरण तयार करणार – मुख्यमंत्री)
निविदेतील अटी अशा असाव्यात की, भारत सरकार आणि NHAI सोबत काम करणाच्या मोठ्या पायाभूत सुविधा कंपन्यांनाच निविदेत भाग घेता येईल. पाणी, गॅस, बीज, इंटरनेट इत्यादी विविध युटिलिटिज टाकण्यासाठी वारंवार खोदकाम आणि खड्डे पडू नयेत यासाठी रस्त्याच्या निविदेतच युटिलिटी कॉरिडॉर बनवण्याची तरतूद असावी. विविध कारणांसाठी सतत, अनियोजित खोदकामामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था आहे हे लक्षात घेण्यासारखे असल्याचे साटम यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community