माझ्या वडिलांचे नाव वापरु नका म्हणता ना, मग महापौर बंगल्यात, उभारले जाणारे 500 कोटींचे स्मारक तुमच्या पैशाने उभारा, असे भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले. उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा एकदा माझ्या वडिलांचे नाव वापरु नका, असे शिंदे गटाला ठणकावून सांगितले. यावरुन अतुल भातखळकर यांनी हल्लाबोल केला आहे. ट्वीट करत त्यांनी उद्धव ठाकरेंचे “माझ्या वडिलांचे नाव वापरु नका” हे वाक्य घेत, पुढे म्हटले की मग महापौरांच्या बंगल्यात, उभारले जाणारे 500 कोटींचे बाळासाहेबांचे स्मारक स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करुन उभारा.
माझ्या वडिलांचे नाव वापरू नका – उध्दव ठाकरे
पण त्यांचे स्मारक महापौर बंगल्यात, सरकारी म्हणजे जनतेच्या पैशाने करा…
ते ५०० कोटी स्वतःच्या खिशातून खर्च करा ना उध्दव जी…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 27, 2022
राऊतांना मुलाखत घ्यायची असेल तर…
सजंय राऊतांना मुलाखत घ्यायचीच आहे तर, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची घेतली पाहिजे. बंद खोलीत मुलाखत घेतात आणि काहीही बेछूट आरोप करतात. हे आरोप बिनबुडाचे आहेत. शिवसेनेने भाजपशी जो दडाफटका केला त्यातून सावरण्यासाठी अशाप्रकारे आरोप केले जात आहेत, असा टोला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे.