सोलापूर विभागाच्या दौंड – कुर्डुवाडी विभागादरम्यान २५ जुलैपासून तांत्रिक कामांनिमित्त ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. ट्रॅफिक ब्लॉकच्या या कामासाठी अनेक विभागांमधील मेल, एक्स्प्रेस रद्द कराव्या लागल्या आहेत. परिणामी चार महिन्यांपूर्वी आरक्षण करूनही अचानक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
( हेही वाचा : धक्कादायक! राज्यात पाच वर्षांखालील बालकांचे सर्वाधिक मृत्यू )
मध्य रेल्वेतील सोलापूर विभागाच्या दौंड- कुर्डुवाडी सेक्शन दरम्यान दुहेरी मार्ग सुरू करण्यासंदर्भातील काम हाती घेण्यासाठी ट्रॅफिक ब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक दिनांक २५ जुलैपासून सुरू झाला असून ९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
- गाडी क्रमांक ११४२२/११४२१ पुणे- सोलापूर-पुणे डेमु गाडी १८ ऑगस्टपर्यंत रद्द
- गाडी क्रमांक १२१६९/१२१७० सोलापूर-पुणे-सोलापूर गाडी १८ ऑगस्टपर्यंत रद्द
- २ ऑगस्टला धावणारी गाडी क्रमांक २२८८२ भुवनेश्वर-पुणे एक्स्प्रेस रद्द
- ४ ऑगस्टला धावणारी गाडी क्रमांक २२८८१ पुणे – भुवनेश्वर एक्स्प्रेस रद्द
- २७ जुलै आणि ३ ऑगस्ट रोजी धावणारी गाडी क्रमांक २२६०१ चेन्नई-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस रद्द
- २९ जुलै व ५ ऑगस्ट रोजी साईनगर शिर्डी-चेन्नई एक्स्प्रेस रद्द असेल.
- ३१ जुलै आणि ७ ऑगस्टला अहमदाबाद-यशवंतपूर एक्स्प्रेस रद्द
- २ ऑगस्ट आणि ९ ऑगस्टला यशवंतपूर-अहमदाबाद एक्स्प्रेस रद्द
- २९ आणि ३१ जुलै रोजी दादर-पंढरपूर एक्स्प्रेस रद्द
- ३ जुलै आणि १ ऑगस्ट रोजी पंढरपूर-दादर एक्स्प्रेस रद्द
- ९ ऑगस्टपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनल-विशाखापट्टनम् एक्स्प्रेस व्हाया पुणे, मिरज, कुर्डुवाडी मार्गे धावेल.
- ही माहिती या गाड्यांचे आरक्षण केलेल्या प्रवाशांना पाठवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.