आठवडाभर गायब असलेल्या पावसाने मुंबईत बुधवारी, 27 जुलै रोजी पश्चिम उपनगर परिसर आणि मध्य मुंबईत अचानक जोरदार बरसायला सुरुवात केली. दुपारीही काही भागांत पावसाच्या सरींचे दर्शन झाल्याने भारावलेल्या मुंबईकरांना वेधशाळेने मात्र दिलासा दिलेला नाही. पुढील दोन दिवस मुंबईत हलका ते मध्यम स्वरुपातच पाऊस भेटीला येईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
दहिसर येथे पावसाचा फारसा जोर नव्हता
पावसाच्या गैरहजेरीत आता ढगाळ वातावरण मुंबईभरात पाहायला मिळत आहे. बुधवारी मुंबईभरात बोरिवली येथे पाऊस बराच वेळ सुरु राहिला. बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे परिसरात ३५.३१ तर बोरिवली अग्निशमन केंद्रात गेल्या १२ तासांत अनुक्रमे ३५.३१ आणि ३५.३२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यातुलनेत दहिसर येथे पावसाचा फारसा जोर नव्हता. मालाड. दिंडोशी, चिंचोली येथेही दिवसभर पाऊस अधूनमधून सुरु होता. मात्र पावसाची नोंद १० ते १३ मिमी दरम्यानच नोंदवली गेली. दहिसरला केवळ १९.८ मिमि पाऊस झाला. मध्य मुंबईत चेंबूर , कुर्ला, घाटकोपर येथेही दुपारी पाऊस सुरु होता. विद्याविहारला ३१ मिमी तर घाटकोपरला ३४.२८ मिमी पाऊस झाल्याची माहिती दिली गेली. सायंकाळनंतर काही भागांत पावसाचे शिडकावे सुरु होते.
(हेही वाचा आता पश्चिम बंगालमध्ये ‘शिंदे पॅटर्न’?)
Join Our WhatsApp Community