74 कोटींच्या बनावट जीएसटी कर पावत्या बनवणारे रॅकेट उघड

150

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाच्या भिवंडी आयुक्तालयाच्या अधिका-यांनी बनावट वस्तू आणि सेवा कर पावत्या बनवणारे रॅकेट उघड झाले आहे. 74 कोटी रुपयांच्या बोगस पावत्यांचा वापर सुमारे 14.4 कोटी रुपयांचे बनावट वस्तू आणि सेवा कर इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) करण्यासाठी केला जात होता. या प्रकरणी, बस्वार कंपनीच्या मालकाला 24 मे 2022 रोजी अटक करण्यात आली. त्यानेच या कंपनीची स्थापना केली होती. तर, दुसऱ्या व्यक्तीला 26 जुलै 2022 रोजी अटक करण्यात आली.  ही व्यक्ती मालक असल्याचे भासवून बस्वार इंडस्ट्रीजच्या नावाने करंट बँक खाते उघडण्यात गुंतली होती आणि 18 कोटी रुपयांचे बनावट व्यवहार केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाच्या भिवंडी आयुक्तालयाच्या कर चुकवेगिरी विरोधी शाखेने या आस्थापनाविरुद्ध तपास सुरू केला. तपासादरम्यान घोषित व्यवसाय पत्ता अस्तित्वात नसल्याचा आढळून आले तसेच कोणत्याही व्यावसायिक घडामोड झाली नसल्याचे आढळून आले. तपासात असेही समोर आले आहे की, या आस्थापनाने 7.20 कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा केला होता आणि 7.20 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट पास देखील केले होते.

( हेही वाचा: शिंदे गटाकडून पुन्हा एकदा नव्या नियुक्त्या जाहीर )

रॅकेट अनेक शहरांत पसरले आहे

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा, 2017 च्या तरतुदींचे घोर उल्लंघन करून, कोणत्याही वस्तूंचा पुरवठा किंवा वस्तू न घेता, या कर क्रेडिटचा लाभ घेण्यासाठी आणि पास करण्यासाठी सुमारे 74 कोटी रुपयांच्या बोगस पावत्या तयार करण्यात आल्या होत्या. या कर फसवणुकीत 126 पेक्षा जास्त व्यावसायिक संस्थांचे जाळे कार्यरत आहे, जे दिल्ली, अहमदाबाद, राजकोट, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या शहरांसह अनेक राज्यात पसरलेले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.