इराकमध्ये आता श्रीलंकेप्रमाणे आंदोलन सुरु झाले आहे. बुधवारी शेकडो संतप्त आंदोलकांनी बगदादमधील संसद भवनावर ताबा मिळवला. अल जझीराच्या वृत्तानुसार, बहुतांश आंदोलक हे इराकी शिया नेते मुक्तदा अल-सुद्र यांचे समर्थक आहेत. माजी मंत्री आणि माजी प्रांतीय गव्हर्नर मोहम्मद शिया अल- सुदानी यांना इराण- समर्थित पक्षाने पंतप्रधानपदासाठी उमेदवारी दिल्याचा निषेध करण्यात येत आहे.
आंदोलकांनी बुधवारी बगदादमधील उच्च सुरक्षा असलेल्या ग्रीन झोन, सरकारी भवन आणि मुत्सद्दींच्या घरांमध्ये प्रवेश केला. यानंतर सर्व आंदोलक हे संसदेतही शिरले. परंतु त्यावेळी संसदेत कोणी उपस्थित नव्हते. अल जझीराच्या रिपोर्टनुसार त्यावेळी संसदेत केवळ सुरक्षारक्षक उपस्थित होते.
( हेही वाचा: आता अहमदनगरचेही नामांतर होणार ? ‘हे’ नाव देण्याची पडळकरांची फडणवीसांना विनंती )
घोषणाबाजी करत आंदोलक संसदेत शिरले
यावेळी आंदोलकांच्या हातात शिया नेते अल सदर यांचे फोटोही होते. पोलिसांनी पहिले सीमेंटच्या भिंती पाडणा-या आंदोलकांवर वाॅटर कॅननचा वापर केला. आंदोलकांना थांबवण्यासाठी पोलीस मुख्य गेटवर तैनात करण्यात आले होते. दोन्ही प्रवेशद्वारांवर मोठ्या प्रमाणात आंदोलक जमले होते. त्यानंतर या आंदोलकांनी पोलिसांनी तयार केलेली सीमेंटची भिंतही तोडली. त्यानंतर अल सुदानी आऊट अशी घोषणाबाजीही केली. अनेक शहरांतून या ठिकाणी आंदोलक जमले होते.
Join Our WhatsApp Community