ज्येष्ठ नागरिकांना कोरोना काळात तिकीटात देण्यात आलेली सवलत रद्द करण्यात आली होती. त्यावर अनेकदा केंद्राला प्रश्न विचारले गेले. त्यावर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आधीच रेल्वे कमी रुपयांत प्रवासी सेवा देते, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा कमी किंमतीत तिकिटे देणे शक्य नसल्याचे म्हटले होते. परंतु आता सरकार यावर विचार करत आहे. ज्येष्ठांना पुन्हा एकदा काही अटी आणि नियम असणार आहेत.
वयाच्या निकषांत बदल करुन प्रवास भाडे सवलत 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जाईल. आधी ही वयोमर्यादा महिलांसाठी 58 वर्षे आणि पुरुषांसाठी 60 वर्षे होती. सवलती पुर्णपणे रद्द केलेल्या नाहीत, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. मार्च 2020 पूर्वी, ज्येष्ठ नागरिक महिलांना तिकीट दरात 50 टक्के आणि पुरुषांना 40 टक्के सवलत देत होती. ही सवलत सर्व प्रकारच्या श्रेणीमध्ये होती. परंतू आता ती फक्त सिटींग आणि स्लिपर कोचसाठीच असणार आहे.
( हेही वाचा: आता अहमदनगरचेही नामांतर होणार ? ‘हे’ नाव देण्याची पडळकरांची फडणवीसांना विनंती )
सर्व ट्रेनमध्ये प्रिमियम तत्काळ योजना सुरु करण्याचा विचार
- सर्व ट्रेनमध्ये प्रिमियम तत्काळ योजना सुरु करण्याच्या पर्यायावरही रेल्वे विचार करत आहे. त्यामुळे सवलतींचा बोजा उचलण्यास उपयोगी होई शकतो. ही योजना सध्या 80 ट्रेनमध्ये आहे. प्रिमियम तत्काळ योजनेत काही आसने मागणीनुसार, मूल्य निर्धारित करुन आरक्षित केली जातात.
- हा कोटा शेवटच्या क्षणी प्रवासाची योजना करणा-या प्रवाशांच्या सुविधांसाठी आहे. ज्यांची थोडा अतिरिक्त खर्च करण्यासाठी तयारी असते. प्रिमियम तत्काळ भाड्यात मूळ प्रवासभाडे आणि अतिरिक्त तत्काळ शुल्काचा समावेश असतो. परिणामी जुलै 2016 मध्ये रेल्वे ज्येष्ठांसाठी सवलती ऐच्छिक केल्या होत्या.
- प्रवाशांना दिल्या जाणा-या 50 हून अधिक प्रकारच्या सवलतींमुळे रेल्वेवर दरवर्षी 2 हजार कोटी रुपयांचा बोजा पडतो. ज्येष्ठ नागिरक सवलत एकूण सवलतीपेक्षा जवळपास 80 टक्के असते. यापूर्वी रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना सवलती सोडण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो यशस्वी झाला नाही.