राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेचे 12 खासदारही शिंदे गटात सामील झाले. शिंदेंना खासदारांपासून ते पदाधिका-यांपर्यंत सगळ्यांचाच पाठिंबा मिळताना दिसत आहे. आता एकनाथ शिंदे यांनी आपला मोर्चा शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांकडे वळवल्याचे दिसत आहे. शिवसेनेत नेतेपद भुषवणारे लीलाधर डाके यांच्या भेटसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले आहेत. तर संध्याकाळी ते माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची भेट घेणार आहेत. लीलाधर डाके यांची भेट घेतल्यानंतर शिंदे यांनी सदिच्छा भेट असल्याचे म्हटले आहे. तसेच, प्रत्येक ज्येष्ठ नेत्याची भेट घेणार असल्याचेही यावेळी सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड पुकारल्यानंतर, अनेक शिवसैनिकांनी त्यांनी समर्थन दिले. तर आता एकनाथ शिंदे शिवसेनेच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत.
शिवसेना वाढवण्याचे काम डाके यांनी केले
लीलाधर डाकेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय लीलाधर डाके यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी आज गेलो होतो. ही सदिच्छा भेट होती. शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी मी त्यांचे आंदोलन खूप जवळून पाहिले. बाळासाहेबांसोबत राहिलेले ते सुरुवातीचे नेते होते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community