अजित पवारांनी सांगितली मंत्रिमंडळ विस्तार न होण्यामागील कारणं!

145

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनपेक्षित घटना घडत आहेत. अशातच ३ जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यात नवे सरकार स्थापन होऊन आता महिना होत आला. अशातच मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्र्यांनी तीन ते चार वेळा दिल्लीचा दौरा केला. तरीही अद्याप राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार का झाला नाही, यामागील कारणं स्पष्ट केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर देखील निशाणा साधला आहे.

(हेही वाचा – OBC Reservation: ‘त्या’ जागांवरील निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार)

सध्या अजित पवार नागपूर दौऱ्यावर असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, या सरकारकडे पुरेसे बहुमत आहे तर मग मंत्रिमंडळ विस्तार का करण्यात येत नाही, दोघे म्हणतात यावर आम्ही दोघे काम करतो आहे, मात्र हे शक्य नाही. प्रत्येक फाईल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जाणार असेल तर कामं कधी होणार, या सरकारला मोठं बहुमत मिळालं आहे, त्यांनी ते विधानसभेतही दाखवलं मग तरीही मंत्रिमंडळ विस्ताराला इतका वेळ का लागतो आहे, असे कारणं स्पष्ट करत त्यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहे.

पुढे अजित पवार असेही म्हणाले की, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटलो. तेव्हाही त्यांना विचारलं की राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार का करत नाही. ते म्हणाले आम्ही करतो… मात्र ते विस्तार करतो असे म्हणत असले तरी ते होत नाही, हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. कदाचित त्यांना दिल्लीतून परवानगी मिळत नसावी, की इतर काही समस्या आहे, हे माहीत नसल्याचे म्हणत अजित पवारांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.