Spam Calls चा वैताग आलाय? ‘या’ Apps च्या मदतीने करा नको असलेले कॉल Block!

175

स्पॅम कॉल येणं ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. आता अर्जंट कॉल्पेक्षा अनावश्यक, स्पॅम कॉल्स अधिक येतात. कधी कर्जाचे तर कधी विम्याचे स्पॅम कॉलही येत असतात. तर असे काही कॉल्स आहेत, जे डिस्कनेक्ट केल्यानंतरही वारंवार येत राहतात. ते कॉल ब्लॉक केले तरी ते कॉल इतर नंबरवरून येतात. तुमच्या मनात अनेकदा असाही प्रश्न पडला असेल की या लोकांपर्यंत आपला मोबाईल नंबर पोहोचतो तरी कसा… स्पॅम कॉलर तुमचा नंबर तरी कसा मिळवतात, तुम्हाला माहितीये का? आणि कोणत्या मोबाईल अॅप्लिकेशद्वारे हे स्पॅम कॉल ब्लॉक करता येतात, हे तुम्हाला माहितीये का…?

(हेही वाचा – LPG सिलिंडरच्या खाली ‘ही’ छिद्रे का असतात? तुम्हाला माहितीये? वाचा काय आहे कारण)

‘या’ अॅप्सच्या मदतीने करा नको असलेले कॉल ब्लॉक

Truecaller

ट्रू कॉलर हे अॅप सर्वाधिक वापरले जाते. हे अॅप अनोळखी कॉल ओळखण्यात मदत करते. यासह फसवणूक, फ्रॉड कॉल्स आणि स्पॅम कॉल शोधते आणि ब्लॉक करते. या अॅपद्वारे तुम्ही कोणताही नंबर ब्लॅकलिस्ट आणि ब्लॉक करू शकता.

Calls Blacklist

कॉल्स ब्लॅकलिस्ट हे देखील एक उत्तम अॅप आहे. हे अॅप कॉल आणि मेसेज या दोन्हीसाठी कॉल ब्लॉकरचे काम करते.

Call Blocker

कॉल ब्लॉकर या अॅपद्वारे कॉल सेंटर, स्पॅम नंबर, रोबोकॉल, टेलीमार्केटिंग इत्यादींवरील अनोळखी कॉल ब्लॉक करण्याचे काम करते.

Should I Answer?

हे अॅप देखील एक उत्तम पर्याय आहे. या अॅपमध्ये स्पॅम नंबर्सचा मोठा डेटाबेस आहे, जो सतत अपडेट केला जातो. जर कोणी कॉल करण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांना आपोआप ब्लॉक करते. या अॅपद्वारे आंतरराष्ट्रीय कॉल्सही ब्लॉक केले जाऊ शकतात.

कुठून मिळतो स्पॅम कॉलर्सना तुमचा नंबर?

स्पॅम कॉल आणि मेसेज वारंवार येणं हे त्रासदायक आहे. तुमच्‍या वैयक्तिक डेटा चोरण्याची ही सुरुवात आहे. तुमचा मोबाईल नंबर हा फक्त एक नंबर नसून डेटा सेटशी जोडलेला असतो. या डेटामध्ये तुमचे नाव, वय आणि सर्व आवश्यक माहिती असते. तुम्ही तुमचा नंबर किंवा वैयक्तिक माहिती एखाद्यासोबत शेअर करता तेव्हा ती पुढे शेअर केली जाते. समजा तुम्ही एखाद्या वेबसाइटवर असाल, जिथे तुम्ही एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी किंवा ऑर्डर करण्यासाठी तुमचा नंबर आणि नाव टाकले, तर तो डेटा सेव्ह होतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.