दिल्ली वाऱ्या…फुटीरांमधील मतभेद…सरकारला ओबीसी आरक्षणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही – जयंत पाटील

122

दिल्ली वाऱ्या करणे…फुटीरांमधील मतभेद मिटवणे…त्यांच्या समजुती घालणे, उपमुख्यमंत्री पद मिळाल्याने भाजपामधील एक गट अस्वस्थ आहे. या सगळ्या व्यापात सध्याचे सरकार व्यस्त आहे. म्हणून ओबीसी आरक्षणाकडे लक्ष देण्यासाठी सरकारकडे वेळ नाही, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

नाहीतर ९२ नगरपालिकांमध्ये आरक्षण मिळाले असते

एकनाथ शिंदे यांचे सरकार येऊन २५ पेक्षा जास्त दिवस झाले, तरी राज्याला मंत्रिमंडळ नाही. याबाबत जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीने स्थापन केलेल्या बांठिया आयोगाने सर्वाेच्च न्यायालयात अहवाल सादर केला आणि त्या अहवालामुळे ओबीसींना आरक्षण मिळाले, मात्र सरकारला त्यावर लक्ष देता आले नाही. सरकार दिल्ली वाऱ्यांमध्ये जरजर झाले असल्यामुळे दुर्लक्ष झाले नाहीतर ९२ नगरपालिकांमध्ये आरक्षण मिळाले असते, असेही जयंत पाटील म्हणाले. वर्धा, नांदेड, यवतमाळ महाराष्ट्राच्या अनेक भागात पूरपरिस्थिती आहे. मात्र सध्या पालकमंत्री नसल्याने तिथे ठामपणे कोणी उभे राहत नाही. मदतकार्याला कोणतेही प्रशासकीय नियंत्रण नाही. म्हणून मदतकार्य नीट होत नाही. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले मात्र अश्रू पुसण्यासाठी कुणीही नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

(हेही वाचा शिवसेनेच्या वेबसाईटवरून राष्ट्रीय कार्यकारिणी ‘बरखास्त’! उरली फक्त घराणेशाही)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.