राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी अध्यक्ष असलेल्या जिल्हा दूध सहकारी कारभारातील अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी शासनातर्फे समिती नियुक्ती करण्यात आली. तर दुसरीकडे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून जिल्हा दूध संघावर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. या प्रकरणातील तक्रारदार तसेच दूध संघाचे माजी सुरक्षा अधिकारी नगराज पाटील यांनी ही माहिती दिली.
संचालक मंडळ बरखास्त
शिंदे-फडणवीस सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना धक्का देत त्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. एकनाथ खडसेंची पत्नी अध्यक्ष असलेल्या जिल्हा दूध सहकारी कारभारातील अनियमिता आणि भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी शासनातर्फे समिती नियुक्ती करण्यात आली आहे. तर दुसरीकडे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून जिल्हा दूध संघावर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. जिल्हा दूध संघाचे माजी सुरक्षा अधिकारी नागराज पाटील यांनी जिल्हा दूध संघाच्या कारभारातील अनियमितता आणि भरती प्रक्रियेतील मोठ्या गैरव्यवहार झाल्याची तक्रार शासनाकडे केली होती. मात्र गेल्या मविआ सरकारकडून याबाबत कोणतीच दखल घेण्यात आली नव्हती. त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारने याच्या चौकशीसाठी समितीची नियुक्ती केली आहे. तसेच विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली आहे. यासंबंधी राज्य शासनाचे उपसचिव एन.बी. मराळे यांनी आदेश काढले आहेत. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community