मरोळच्या मार्गावर होणार मेट्रो ट्रेन पार्क

136
मरोळ मरोशी मार्ग, सारीपुत नगराजवळील रॅम्पपासून मरोळ नाका मेट्रो स्थनाकापर्यंतच्या ३ कि.मी. लांबीच्या ट्रॅकवर प्रोटोटाइप ट्रेनच्या चाचण्या होणार आहेत. येथेच उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या सुविधेत ट्रेन पार्क करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिली आहे. आरे कारशेड प्रकल्प रखडल्याने आता समांतर पातळीवर याचे काम सुरू होइपर्यंत मरोळच्या मार्गावर चाचण्या घेऊन तिथेच या आलेल्या मेट्रो ट्रेन पार्क केल्या जाणार आहेत.
दिनांक २१ जुलै २०२२ च्या आदेशान्वये  राज्य सरकारने दिनांक २९ नोव्हेंबर २०१९चे आदेश रद्दबातल ठरवले आणि आरे येथील मेट्रो कारशेडचे काम पुन्हा सुरू करण्यास मुंबई मेट्रो रेल कॉर्परेशनला निर्देश दिले. त्यानुसार डेपोमध्ये प्राथमिक कामे सुरू करण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने साफसफाई आणि जागेचे समांतरीकरण आदी कामांचा समावेश आहे.  त्याचप्रमाणे डेपोचे मुख्य काम सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ यांची उपलब्धता करून देण्याचे काम कंत्राटदारांनी सुरू केले आहे. हे सर्व काम  सर्वोच्च न्यायालय,  मुंबई उच्च न्यायालय आणि राज्य सरकारचे सर्व आदेश आदींचे काटेकोपणे पालन करून करण्यात येत आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार निर्माण करण्यात आल्या सुविधा 

तसेच ट्रेनची प्रारंभिक डिझाईन  चाचणी करण्याच्या अनुषंगाने आरे डेपो बाहेर सरीपुत नगर येथील रॅम्प नजिक ट्रेनचे डबे उतरवून घेणे तसेच त्यांची जुळवणी करणे यासाठी तात्पुरती सुविधा निर्माण करण्यात आली आहे. ही सुविधा निर्माण करण्या संदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारने यापूर्वीच आदेश दिले होते. त्यानुसार ही सुविधा तयार करण्यात आली आहे. ही सुविधा मरोळ मरोशी मार्गाजवळील बोगद्याच्या मुखाशी आहे.
आठ डब्यांची एक ट्रेन आंध्र प्रदेशातील श्रीसिटी येथे तयार करण्यात आली आहे. या ट्रेन चे लवकरच मुंबईत आगमन होत आहे. याच मेट्रो ट्रेनच्या प्रारंभिक डिझाईन चाचण्या आता सुरू होणार आहेत. कारडेपोचे काम आणि डबे उतरवून घेण्यासाठीची सुविधा ही वेगवेगळी कामे असून एकाचवेळी हाती घेण्यात आली असल्याचे, मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने स्पष्ट केले आहे.

कार डेपोची देखभाल दररोज केली जाते

कुठल्याही मेट्रो प्रकल्पासाठी कार डेपो अतिशय महत्त्वाचा असतो. या डेपोच्या ठिकाणी ट्रेनची देखभाल दररोज केली जाते. तसेच प्रतिबंधात्मक, सुधारात्मक आणि दुरुस्तीची कामेही याठिकाणी हाती घेण्यात येतात. यामुळे सर्व ट्रेन्स सुरळीतपणे सुरू राहण्यास मदत होते. परिणामी प्रवाशांचा दैनंदिन प्रवास आरामदायी, वेगवान आणि सुरक्षित होतो. यासाठी कार डेपो एक महत्त्वाचा दुवा ठरत असतो. याच ठिकाणी ट्रेन्स उभ्या करण्याची सुविधा असते. शिवाय चाकांची काळजी घेणे, ट्रेनची सफर सुरक्षित होण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध चाचण्या सुविधा उपलब्ध असतात.
मरोळ मरोशी मार्ग, सारीपुत नगराजवळील रॅम्पपासून मरोळ नाका मेट्रो स्थानाकापर्यंतच्या ३ कि.मी. लांबीच्या ट्रॅकवर प्रोटोटाइप ट्रेनच्या चाचण्या होणार आहेत. येथेच उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या सुविधेत ट्रेन पार्क करण्यात येणार आहे. डेपोचे काम पूर्ण करून सीप्झ ते बी.के.सी.पर्यंतचा पहिला टप्पा २०२४ च्या पहिल्या तीन महिन्यातच सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचा मानस मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन यांनी व्यक्त केला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.