राष्ट्रवादी पक्षात असलेल्या सुषमा अंधारे आता शिवसेना पक्षात आलेल्या आहेत. महत्वाचे म्हणजे त्यांना लगेच उपनेतेपद देण्यात आले आहे. शिवसेना कोणाची, ठाकरेंची की शिंदेंची हा प्रश्न अजूनही निकालात निघालेला नाही. अशात शिंदे आणि ठाकरे आपापली ताकद दाखवत आहेत. सुषमा अंधारे यांना भविष्याच्या दृष्टीकोनातून पक्षात प्रवेश देण्यात आला आहे.
त्यांना पक्षात घेतल्यामुळे त्यांच्या समाजाची मते ठाकरेंना मिळतील असा त्यांचा अंदाज असावा. अंधारे ह्या वक्ता आहेत. त्या रोखठोक बोलतात, जमलेल्या लोकांना त्यांचं भाषण आवडतं. त्यांचं सामाजिक कार्यदेखील आहे. परंतु सुषमा अंधारे यांचे विचार बाळासाहेबांच्या शिवसेनेशी जुळत नाहीत. शेंडी-जानव्याचं हिंदुत्व नाकारणं म्हणजे आम्ही परंपरावादी नाही असा याचा अर्थ घेता येईल. मुळात बाळासाहेब ठाकरे हे कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळखले जायचे.
त्यामुळे बहुजन समाज ठाकरेंपासून दूर जाऊ शकतो
सुषमा अंधारे यांनी ठाकरेंवर सडकून टीका केली होती. त्यांनी भारताचा प्राण म्हणजेच प्रभू श्रीरामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यावर खालच्या दर्जाची टीका केली आहे. तुम्ही जर परंपरावादी नसाल तर तुम्ही राम-कृष्णाला देवाचा अवतार मानणार नाही. परंतु हिंदू म्हणून, भारतीय म्हणून आपल्याला या महापुरुषांचा आदर वाटतो. ते आपले इतिहासपुरुष आहेत. भारताची व्याख्या राम आणि कृष्णाशिवाय करता येणार नाही. त्यामुळे बहुजन समाज आता ठाकरेंपासून दूर जाऊ शकतो.
( हेही वाचा: शिंदे व मनोहर जोशी भेट, फोटो बोलका आहे )
…तर हिंदू आपली ताकद दाखवेल
केवळ ब्राह्मण समाज धार्मिक असतो आणि ईश्वराचा उपासक असतो, असा समज करुन घेणे निव्वळ मूर्खपणा आहे. हिंदू समाज हा धार्मिक आहे. राम, कृष्णाला नमस्कार करुनच हिंदू घराबाहेर पडतो. शेंडी आणि जानवं केवळं ब्राह्मण समाज घालत नाही. तर हिंदूंमधील अनेक जातींमध्ये मुंज करण्याची प्रथा आहे. तेव्ह शेंडीही येते आणि जानवं देखील येतं. तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालतात म्हणून शेंडी-जानव्याचं हिंदुत्व नको हे वाक्य हिंदू खपवून घेतात. आता तुम्ही हिंदूंचा तिरस्कार करणार्यांना पक्षात घेऊन, त्यांना उपनेतेपद देणार असाल तर हिंदू समाज आपली ताकद मतपेटीतून नक्कीच दाखवेल.
Join Our WhatsApp Community