राज्यामधील सत्तांतराला जवळजवळ एक महिना पूर्ण झाल्याने, विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे, असे असतानाच आता शिवसेनेचे नाराज आमदार अब्दुल सत्तार यांनी थेट मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्र्यांच्या शपथविधीसंदर्भातील तारखेबद्दल भाष्य केले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीमध्ये असणा-या सत्तार यांनी 3 ऑगस्टपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे म्हटले आहे.
अंतिम यादीही तयार
सत्तार यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये खातेवाटप आणि मंत्रीपदासंदर्भातील वाटपाबद्दल अंतिम बोलणी पूर्ण झाल्याचा दावा सत्तार यांनी केला आहे. कोणाला किती खाती मिळणार वगैरे ही वाटाघाटी झालेली आहे. मात्र, अंतिम निर्णय झालेला नाही, असे सत्तार यांनी म्हटले आहे. मंत्रीमंडळ विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची चर्चा झाली असून, अंतिम यादीही तयार आहे. दिल्लीतील वरिष्ठ नेते ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासोबत त्यांनी विचारविनिमय केलेला आहे. त्यावर लवकरच अंतिम शिक्कामोर्तब होईल, असे सत्तार म्हणाले आहेत.
( हेही वाचा: आयुक्तांचा दणका; ‘या’ राजकीय नेत्यांच्या साखर कारखान्यांना नोटिसा )
Join Our WhatsApp Community