कोरोनाच्या काळात कोविन अॅपवर नोंदी करुन कोरोना लस देण्यात आली. त्यामुळे आता सरकारने एक मोठा निर्णय घेणार आहे. आता या अॅपद्वारे मुलांसाठी पोलिओ, हिपॅटायटीस आणि इतर नियमित लसींचे बुकिंग सुरू करण्याची तयारी सुरू आहे. कोरोना लसीकरणाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कोविन पोर्टलचा वापर इतर लशींच्या नोंदणीकरता करण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत आहे.
येत्या काही महिन्यांत ही सेवा उपलब्ध होईल
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.आर.एस.शर्मा म्हणाले की, येत्या काही महिन्यांत ही प्रक्रिया सुरू केली जाईल. या प्लॅटफॉर्मवर रुटीन लसीचे स्लॉटदेखील बुक केले जाऊ शकतात. शर्मा म्हणाले की, सध्या या पोर्टलचा वापर कोरोना लशीच्या स्लॉट बुकिंगसाठी केला जात आहे.
( हेही वाचा: ‘या’ दिवशी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार; अब्दुल सत्तारांनी सांगितली तारीख )
जुनी सुविधा उपलब्ध
इतर रोगांसाठी लसींचे स्लॉट बुक करण्यासाठी कोवीन अॅप विकसित केले जाईल. एकदा लसीकरण स्लॉट बुक झाल्यानंतर, ज्या मुलांचे लसीकरण बाकी आहे, त्यांच्या पालकांना अॅप एक रिमांयंडर पाठवेल, असेही शर्मा यांनी सांगितले.
ही माहिती पालकांना दिली जाईल
लोकांच्या आजूबाजूच्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये लस दिली जात आहे, ही माहिती पोर्टलच्या माध्यमातून दिली जाणार आहे. लोकांना त्यांच्या मोबाईल नंबरवरून अपॉइंटमेंट बुक करावी लागेल. वापरकर्ते लसीकरण कार्यक्रमाच्या प्रमाणपत्रावर देखील अपलोड करू शकतात.
Join Our WhatsApp Community