ओबीसीसह सर्वसाधारण महिलांसह सर्वसाधारण प्रवर्गांच्या प्रभागांचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आल्यानंतर याचा फटका आता महापालिकेतील दिग्गजा बसला आहे. पहिल्या आरक्षणानंतर अनेकांचे प्रभाग महिला आरक्षित झाल्यानंतर ओबीसीच्या आरक्षणाकडे डोळे लावून बसलेल्या काहींचे या आरक्षण सोडतीतही हिरमोड झाला. त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणानंतरही मागील वेळेत तोंडात आलेला घास या आरक्षणात काढून घेण्यात आला तर काहींना नशिबाने चांगली साथ दिल्याचे या सोडतीत पहायला मिळत आहे.
( हेही वाचा : BMC Election : महापालिका निवडणूक प्रभाग आरक्षण लॉटरी सोडत जाहीर; कोणाच्या प्रभागाचे काय आरक्षण जाणून घ्या)
ओबीसी आरक्षणाचा हा फटका पुन्हा एकदा माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, भालचंद्र शिरसाट,आशिष चेंबूरकर, सदा परब, मंगेश सातमकर आदींना बसला आहे. विशेष म्हणजे मागील आरक्षणात महिला प्रभाग झाल्याने जल्लोष करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांचा प्रभाग आता महिला ओबीसी झाला आहे. तर माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा प्रभाग महिला झाल्याने जो प्रभाग खुला झाला होता, तिथे त्यांनी कामाला सुरुवात केली होती, परंतु आताच प्रभाग १८० हा महिला ओबीसी झाला आहे. त्यामुळे त्यांना आसपासही नजरेत कुठे प्रभाग शिल्लक राहिलेला नाही.
विशेष म्हणजे मागील आरक्षणात भाजपचे माजी पक्षनेते विनोद मिश्रा यांचा प्रभाग महिला आरक्षित झाला होता, परंतु या आरक्षणात नशीबाने त्यांना साथ दिली.त्यांचा प्रभाग आता सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. तर यासह भाजपचे जितेंद्र पटेल यांचा महिलासाठी राखीव झालेला प्रभाग खुला झाला तर निकीता निकम यांचा महिला प्रभागही आता खुला झाल्याने माजी विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांच्या परतीचा मार्ग खुला झाला आहे. यासह शिवसेनेचे बेहराम पाड्यातील नगरसेवक हाजी हालिम शेख यांचा महिला आरक्षित प्रभाग आता खुला झाला आहे, तर माहुल येथील शिवसेनेचे नगरसेवक श्रीकांत शेट्ये यांचा प्रभाग महिला झाला होता, पण तोही प्रभाग आता खुला झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटले आहे. याशिवाय शिवसेनेच्या स्नेहल मोरे यांचा प्रभाग खुला झाला होता, पण आता तो प्रभाग महिला आरक्षित झाला आहे.
अशाप्रकारे नशिबाने केलेली या माजी नगरसेवकांची थट्टा
- रिध्दी खुरसुंगे : आधीचे आरक्षण –खुले, आताचे आरक्षण -ओबीसी महिला
- रुपाली आवळे : आधीचे आरक्षण –खुले, आताचे आरक्षण -ओबीसी महिला
- बिंदू त्रिवेदी : आधीचे आरक्षण –खुले, आताचे आरक्षण -ओबीसी
- राखी जाधव : आधीचे आरक्षण –महिला, आताचे आरक्षण -ओबीसी महिला
- विठ्ठल लोकले : आधीचे आरक्षण –महिला, आताचे आरक्षण -ओबीसी महिला
- योगीराज दाभाडकर : आधीचे आरक्षण –खुले, आताचे आरक्षण -ओबीसी महिला
- वैशाली शेवाळे : आधीचे आरक्षण –महिला, आताचे आरक्षण -ओबीसी
- अनिष मकवानी : आधीचे आरक्षण –खुले, आताचे आरक्षण -ओबीसी
- प्रतिमा खोपडे : आधीचे आरक्षण –महिला, आताचे आरक्षण -ओबीसी महिला
- यशवंत जाधव : आधीचे आरक्षण –महिला, आताचे आरक्षण -ओबीसी महिला
- सोनम जामसूतकर आधीचे आरक्षण –महिला , आताचे आरक्षण -ओबीसी
- आशिष चेंबूरकर : आधीचे आरक्षण –खुले, आताचे आरक्षण -ओबीसी
- स्नेहल आंबेकर आधीचे आरक्षण –महिला, आताचे आरक्षण -ओबीसी महिला
- संगीता हंडोरे : आधीचे आरक्षण –महिला, आताचे आरक्षण -ओबीसी
- रामदास कांबळे : आधीचे आरक्षण –खुले, आताचे आरक्षण -ओबीसी महिला
- कृष्णवेणी रेड्डी : आधीचे आरक्षण –खुले, आताचे आरक्षण -ओबीसी महिला
- नेहल शाह : आधीचे आरक्षण –खुले, आताचे आरक्षण -ओबीसी
- अश्विनी माटेकर : आधीचे आरक्षण –खुले, आताचे आरक्षण -ओबीसी महिला
- डॉ. सईदा खान : आधीचे आरक्षण –खुले, आताचे आरक्षण -ओबीसी महिला
- अलका केरकर : आधीचे आरक्षण –खुले, आताचे आरक्षण -ओबीसी महिला
- सागरसिंह ठाकूर : आधीचे आरक्षण –खुले, आताचे आरक्षण -ओबीसी महिला
- रमेश कोरगावकर : आधीचे आरक्षण –खुले, आताचे आरक्षण -ओबीसी महिला
- तुळशीराम शिंदे : आधीचे आरक्षण –खुले, आताचे आरक्षण -ओबीसी