महापुरुष किंवा मोठे नेते केवळ त्यांच्या कुटुंबाचे नसतात, तर ते समाजाचे असतात. उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीमध्ये असं म्हटलं की माझ्या वडिलांचे फोटो लावू नका. तुमच्या वडिलांचे फोटो लावा. खरं पाहता हे वाक्य राजकीयदृष्ट्या अपरिपक्व आहे. कुणी राजकीय नेता राजकारणात नसलेल्या वडिलांचे फोटो लावून राजकीय आखाड्यात का उतरेल? आणि राजकीय नेता हा काय केवळ कुटुंबापुरता मर्यादित असतो का?
( हेही वाचा : द्रौपदीची विटंबना कलीयुगातले दुःशासनही करताहेत, काँग्रेसने माफी मागावी)
वडिलांचे शब्द खोटे ठरवले
ज्यावेळी उत्पल पर्रीकर यांनी कै. मनोहर पर्रीकर यांचा वारसा सांगितला तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी केलेलं विधान अतिशय महत्वाचं आहे. ते म्हणाले, ’पर्रीकरांचा वारसा हा भाजपाचा आहे.’ त्याचप्रकारे बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा शिवसेनेचा आहे, शिवसैनिकांचा आहे आणि त्यांना हिंदुह्रदयसम्राट म्हणतात म्हणून हिंदुंचादेखील आहे. जर उद्धव ठाकरे यांना वाटत असेल की कुणी बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा वापर करु नये तर त्यांनी स्पष्ट करायला हवं की त्यांचे केवळ त्यांच्या कुटुंबापुरते मर्यादित आहेत. शिवसेना व महाराष्ट्रातील जनता यांच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही. असं ठाकरे म्हणू शकतात का? तर नाही.
बाळासाहेब ठाकरे अगदी तरुणपणापासून सामाजिक जीवनात आहे. वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांनी संघटना स्थापन केली. मग ते एक राजकीय नेते झाले, त्यानंतर हिंदूत्वाकडे त्यांचा प्रवास झालेला आहे. नेपाळमधले हिंदू सुद्धा त्यांचा आदर्श घेत होते. इतका मोठा वारसा असतानादेखील उद्धव ठाकरे पवार आणि सोनिया गांधींचा गटात शिरले आणि आपल्या हातानेच त्यांनी वडिलांचे शब्द खोटे ठरवले.
… तर हिंदूंनाही त्यांचा अभिमान वाटला असता
ज्या कॉंग्रेसशी लढण्यात त्यांनी आपलं आयुष्य खर्च केलं. उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशीच युती केली. ठाकरे काँग्रेस संस्कृतीशी इतके एकरुप झाले की त्यांच्याच पक्षातल्या लोकांना उठाव करावा लागला. वडिल म्हणून पूजा करायचा अधिकार उद्धव ठाकरेंकडे निश्चितच आहे, पण बाळासाहेबांचा वारसा उद्धव ठाकरे चालवत नाहीत असं खेदाने म्हणावं लागत आहे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा वारसा चालवला असता तर हिंदूंनाही त्यांचा अभिमान वाटला असता.
Join Our WhatsApp Community