राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. महाराष्ट्राचा अपमान राज्यपालांनी केला आहे, असे म्हणत विरोधक आक्रमक झाले आहेत. आता यावर मनसेने आपली प्रतिक्रिया दिली आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी ट्वीट करत, राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. आधी सावित्रीमाईंचा आणि आता महाराष्ट्राचा अपमान होत असेल, तर पदाचा मान वगैरे काही नाही. ज्या विषयात कळत नाही तिथे राज्यपालांनी चोमडेपणा करु नये, असे ते गजानन काळे यांनी म्हटले आहे.
गजानन काळे काय म्हणाले?
मागे सावित्रीमाईंबद्दल आता मराठी, महाराष्ट्राबद्दल बेताल वक्तव्य केले आहे. हे पार्सल उत्तराखंडला परत पाठवण्याची वेळ आली आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. मराठी, महाराष्ट्राची सभ्यता, संस्कृतीचा अवमान होत असेल, तर राज्यपाल या पदाचा मान, मरातब गेला चुलीत. ज्या विषयात कळत नाही तिथे चोमडेपणा करु नका, असे काळे यांनी म्हटले आहे.
मागे सावित्रीमाई बद्दल आता मराठी,महाराष्ट्राबद्दल बेताल वक्तव्य.
हे पार्सल उत्तराखंडला परत पाठवण्याची वेळ आली आहे.
हे खपवून घेतलं जाणार नाही.
मराठी,महाराष्ट्राची सभ्यता,संस्कृतीचा अवमान होत असेल तर राज्यपाल या पदाचा मान,मरातब गेला चुलीत.
ज्या विषयात कळत नाही तिथे चोमडेपणा करू नका— Gajanan Kale (@MeGajananKale) July 30, 2022
राज्यपालांनी नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये
मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे की, ज्यांना असे वाटते आर्थिक प्रगती हीच प्रगती आहे ही बौद्धिक दिवाळखोरी आहे. मराठी माणसाच्या त्यागामुळे मुंबई आणि महाराष्ट्र घडला आहे. मराठी माणसामुळे इतरांचा फायदा झाला आहे. राज्यातील आधीच्या सरकारने जी धोरणे आखली त्यामुळे मुंबई, महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे आले, म्हणून महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र प्रगत झाला आहे. महाराष्ट्राचा अपमान कदापी सहन करणार नाही. नको त्या ठिकाणी जे समजत नाही त्याबाबत त्यांनी बोलू नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये, असे त्यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community