“राज्यपालांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा गुन्हा केलाय”,उद्धव ठाकरेंचा राज्यपालांवर जोरदार हल्लाबोल

130

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, राज्यपालांवर हल्लाबोल केला आहे. राज्यपालांनी जे वक्तव्य केले आहे त्या वक्तव्याने त्यांनी हिंदू समाजात फूट पाडण्याचा गुन्हा केला आहे. राज्यपालांनी केलेलं वक्तव्य हे अनावधानाने आलेले नाही. मराठी माणसाचा इतका अपमान कोणी केला असेल, तर मला असे वाटते की राज्यपालांना नारळ द्यावा किंवा तुरुंगात टाकावे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांवर जोरदार हल्ला चढवला आहे.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, राज्यपाल म्हणून त्या खुर्चीचा मान राज्यपालांनी ठेवला पाहिजे. पण त्या खुर्चीत बसवलेल्या कोश्यारींना त्या खुर्चीचा मान ठेवता आला नाही. गेल्या तीन वर्षातील त्यांची विधाने असतील, काही त्यांचे कॅमे-याने टिपलेली दृष्य असतील ते पाहिल्यावर महाराष्ट्राच्या नशिबी अशी माणसे का येतात हा प्रश्न पडल्याचे, ठाकरे यावेळी म्हणाले.

( हेही वाचा: “मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी”, राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही- एकनाथ शिंदे )

कोल्हापुरी जोडा दाखवायची वेळ आलीय

महाराष्ट्रातील चांगल्या गोष्टी त्यांनी पाहिल्या असतील. महाराष्ट्र का घी देखा, पण कोल्हापूरका जोडा नहीं देखा. कोल्हापूर वाहन आहे. तो जोडा त्यांना दाखवण्याची गरज आहे. कोल्हापुरी वहान जगप्रसिद्ध आहे. त्याचा अर्थ काय लावायचा तो लावा. मी त्यावर बोलणार नाही, पण महाराष्ट्रातील कष्टकरी लोकांनी तो तायर केला आहे. तो कोल्हापुरी जोड्याचा उपयोग कसा करेल, त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांवर हल्लाबोल केला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.