मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आता ‘यात्री’ मोबाइल या अॅप्लिकेशनवर लोकल ट्रेनच्या LIVE लोकेशनची माहिती मिळते. १३ जुलै २०२२ रोजी हे यात्री ॲप प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले. अल्पावधीतच या ॲपला प्रवाशांची पसंती मिळत आहे.
• यात्री ॲप डाऊनलोड करणाऱ्या प्रवासी संख्येत २५ टक्के वाढ.
• ट्रेन ट्रॅक करताना ॲपवर घालवलेला सरासरी वेळ तिप्पट झाला आहे.
( हेही वाचा : फिरायला जाताय? ‘या’ भागातील पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू )
मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास सुलभ करणे हा यात्री ॲपचा उद्देश आहे. यात्री अॅप दैनंदिन उपनगरीय प्रवाशांना रेल्वे विषयीची माहिती मिळविण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासाचे उत्तम नियोजन करण्यासाठी उपयुक्त साधन आहे. मेगाब्लॉकमुळे रेल्वेसेवा विस्कळीत होणे, ट्रेन रद्द करणे किंवा विशेष गाड्यांची माहिती प्रवाशांना यात्री या अॅपद्वारे मिळते. त्यामुळे प्रवासी मोठ्या प्रमाणावर यात्री अॅपचा वापर करत आहेत.
यात्री अॅपची वैशिष्ट्ये
1. थेट अपडेट मिळतात
2. लोकल ट्रेन्सचे अपडेट केलेले वेळापत्रक
3. उपनगरीय गाड्यांचे तिकीट भाडे तपशील
4. स्त्रोत आणि गंतव्य स्थानके प्रविष्ट करून प्रवासाचे नियोजन
5. मेल एक्सप्रेस ट्रेनची माहिती जसे की “स्पॉट तुमची ट्रेन” आणि “पीएनआर स्थिती”
6. मुंबई विभाग, मध्य रेल्वेवरील स्थानकांवर स्थानकनिहाय सुविधा पाहणे
7. रेल्वे आणि वैद्यकीय आपत्कालीन क्रमांक
8. आवडत्या (नियमित) गाड्या आणि मार्गांवर अलर्ट सेट करणे
9. एका टॅपमध्ये SOS साठी रेल्वे आपत्कालीन स्थितीशी संपर्क साधणे
10. मेट्रो, मोनो, फेरी आणि बस माहिती आणि वेळापत्रक
Join Our WhatsApp Community