महिलेला शिवीगाळ प्रकरणी संजय राऊतांवर गुन्हा दाखल

155

अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर सांताक्रूझ मधील वाकोला पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एका महिलेसोबत फोनवर बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी तिला अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला झाला होता. तसेच या महिलेकडून याप्रकरणी वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती.

(हेही वाचाः मॅकेनिकल इंजिनियर तरुण एटीएसच्या ताब्यात; दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय)

पोलिसांनी दाखल केला गुन्हा

वाकोला पोलिसांकडून या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून संजय राऊत यांच्याविरुद्ध अश्लील भाषेचा वापर केल्याप्रकरणी कलम ५०७ प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी या महिलेला वृत्तपत्रात चिठ्ठी टाकून त्या चिठ्ठीत देखील तिच्याबद्दल अपशब्दांचा वापर करून तिला धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी वाकोला पोलिस ठाण्यात तसेच पोलिस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. मात्र या तक्रारीची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

संजय राऊत यांची 70 सेकंदांची एक ऑडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत यांनी 26 वेळा महिलेला अत्यंत अश्लील भाषेत शिव्या दिल्या आहेत. ते एका महिलेशी बोलत आहेत आणि ऑडिओमध्ये तिला फोन बंद करण्याची धमकी सुद्धा आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.