शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी रविवारी सकाळीच ईडीचे पथक दाखल झाले आहे. पत्राचाळ प्रकरणात सध्या राऊतांची त्यांच्या भांडुपमधल्या मैत्री या बंगल्यात चौकशी सुरू आहे. यावर शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.
( हेही वाचा : शिवसेना सोडणार नाही, मरेन पण शरण जाणार नाही; ईडी घरात दाखल झाल्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया)
शिवसैनिक आज आनंदी झाले
संजय राऊत हे अत्यंत हुशार नेते आहेत त्यांना ईडीची भीती वाटत नाही असा खोचक टोला शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी राऊतांना लगावला आहे. ईडीची जेव्हा एवढी मोठी धाड पडते तेव्हा अटक होण्याची शक्यता जास्त असते. शिवसैनिक आज आनंदी झाले असतील ज्याच्या भोंग्यामुळे शिवसेनेचे ४० आमदार १२ खासदार गेले ते सर्व आनंदी आहेत. संजय राऊत हे फक्त प्रवक्ते आहेत, लीडर नाहीत. अशी टीका शिरसाट यांनी केली आहे. तसेच कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे संजय राऊतांच्या या ट्वीटबाबत शिरसाट म्हणाले, बाळासाहेबांची शपथ घेऊ नका एवढा मोठा माणूस तो नाही, बाळासाहेबांची शपथ घेण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे आम्ही या शिवसेनेत ४० वर्ष आहोत. तुम्ही शिवसेना सोडू नका एक दिवस हीच शिवसेनेतून तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल तेव्हा त्यांना त्यांची जागा कळेल असे शिरसाट म्हणाले.
शरद पवारांच्या नादी लागून शिवसेनेचं वाटोळं केलं
संजय राऊतांवर एवढा संताप का असा प्रश्न केल्यावर शिरसाट म्हणाले, याच माणसाने शरद पवारांच्या नादी लागून शिवसेनेचं वाटोळं केलं ज्यावेळी आम्ही उद्धव ठाकरेंना सांगायला जायचो आपण राष्ट्रवादी-कॉंग्रेस सोबत नको राहूया तेव्हा याच माणसाने आपण राष्ट्रवादी सोबत कसं असलं पाहिजे हे दाखवण्याचा प्रयत्न केला त्याचाच हा परिणाम आहे. म्हणून त्यांच्याबद्दल मला संताप आहे.
Join Our WhatsApp Community