डीएचएफएल घोटाळ्यात सहभागाचा आरोप असलेले उद्योगपती अविनाश भोसले यांच्या मालकीचे हेलिकॉप्टर शनिवारी सीबीआयने जप्त केले. येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्यात अविनाश भोसलेंना 26 मे 2022 रोजी अटक करण्यात आली होती.
खासगी हेलिकॉप्टर जप्त
युनियन बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील 17 बँकांच्या कन्सोर्टियमला 34 हजार 615 कोटी रुपयांचे नुकसान करणाऱ्या डीएचएफएलच्या घोटाळ्यात त्याचा सहभाग असल्याचा आरोप अविनाश भोसले यांच्यावर आहे. त्यांचे ऑगस्टा वेस्टलँडचे हेलिकॉप्टर सीबीआयकडून जप्त करण्यात आले. गेल्या 26 मे रोजी भोसलेंना अटक केल्यानंतर 10 दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता त्यांचे खासगी हेलिकॉप्टर जप्त करण्यात आले आहे.
( हेही वाचा : Confrim तिकीट नाहीये? आता ट्रेनमध्ये प्रवास करताना मिळेल हक्काची जागा)
भोसले यांच्या घरावर एप्रिल महिन्यातच सीबीआयने छापे घातले होते. तर मागील वर्षी सीबीआयने त्यांची तब्बल 40.34 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. मागील काही वर्षांपासून येस बॅंक व डीएचएफएल प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरु आहे. त्यांनी यापुर्वी उद्योजक संजय छाब्रिया यांना अटक केली आहे, तर विनोद गोएंका व शाहीद बलवा यांच्यावरही कारवाई केली आहे.दरम्यान, याच बँक गैरव्यवहार प्रकरणामध्ये भोसले यांचेही नाव पुढे आले होते. त्यानुसार, सीबीआयकडून भोसले यांचा तपास सुरु होता. भोसले यांचे घर व काही मालमत्तांवर एप्रिल महिन्यात सीबीआयने छापे टाकून मोठ्या प्रमाणात झाडाझडती घेतली होती.
Join Our WhatsApp Community