९ तासांच्या चौकशीनंतर अखेर संजय राऊतांना ईडीने घेतले ताब्यात

178

पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत  यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ईडीचे ९ तासांच्या चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेतले. त्यांची ईडीचे १० अधिकारी सकाळपासून चौकशी करत होते. संजय राऊत आणि त्यांची पत्नी यांची चौकशी सुरु होती. काही वेळानंतर राऊत यांच्या घराबाहेर पोलिसांसह सीआरपीएफचा फौजफाटा हळूहळू वाढू लागला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
त्यानंतर साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे.

दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीतील फ्लॅटवर देखील ईडीचे सर्च ऑपरेशन सुरु आहे. ईडी अधिकाऱ्यांकडून राऊतांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया दुपारी ३-३.३० वाजताच्या सुमारास सुरु झाली. त्यानंतर वाजता संजय राऊत यांना आता ३.५० च्या सुमारास ताब्यात घेण्यात आले आहे. आता ईडीचे अधिकारी बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात घेऊन जाणार आहेत.  पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी रविवारी सकाळी सात वाजताच ईडीच्या (सक्तवसुली संचालनालय) १० अधिकाऱ्यांच्या पथकाने शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील भांडुप येथील बंगल्यावर छापेमारी केली.

(हेही वाचा sanjay raut ED Inquiry : निर्लज्जपणाचे कारस्थान सुरु आहे – उद्धव ठाकरे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.