मंकी पॉक्स बद्दल जाणून घ्या

154

देशात आता मंकी पॉक्सचे रुग्ण वाढत असताना या आजाराच्या संशयित रुग्णांची राज्यातील संख्या १२ पर्यंत पोहोचल्याने आरोग्य विभागही तयारीला लागले होते. मात्र या रोगाबाबत अद्याप निश्चित स्वरूपाच्या मार्गदर्शक सूचना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने जारी केलेल्या नाहीत. आजाराची लक्षणे दिसून आल्यानंतर स्वतःला अलिप्त ठेवूनच बरे करता येते. आजाराची टक्केवारी एका टप्प्यानंतर जास्त दिसून आली तरच उपचार सुरु करता येतात अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. पालिका रुग्णालयाने मुंबईतील दोन संशयित कोरोना रुग्णांच्या मंकी पॉक्सच्या चाचणीसाठी रुग्णांच्या लघवी, विष्ठा आणि रक्ताचे नमुने घेतले होते. या नमुन्यांच्या आधारावर मंकी पॉक्सचे निदान केले जाते, अशी माहिती डॉ. गोमारे यांनी दिली.

( हेही वाचा : MNS News : अमित ठाकरे सक्रिय! १०० महाविद्यालयांमध्ये ‘मनविसे युनिट’ स्थापन होणार )

कसे सुरक्षित राहता येईल

  • मंकी पॉक्स या आजाराच्या ठराविक उपचार पद्धती नाही त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब व इतर आजार असल्याच्या
  • रुग्णांनी आजार नियंत्रणात ठेवावे
  • शरीरात रोग प्रतिकारक शक्ती वाढवावी.
  • बाधित माणसाच्या शरीरातील द्रव , लैंगिक संपर्क किंवा जखमांचा स्त्राव
  • बाधित व्यक्तीच्या श्वसनमार्गातून बाहेर पडणारे थेंब
  • बाधित रुग्णांचे कपडेही वापरू नका
  • बाधित रुग्णाने मास्क वापरणे तसेच तसेच बाधित रुग्णाच्या चुकून संपर्कात आल्यास मास्क तातडीने वापरा
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.