पत्रा चाळ प्रकरणी ईडीने शिवसेना नेते संजय राऊत यांना ९.३० तास चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले, त्यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात त्यांना आणल्यानंतर संजय राऊत थेट ईडीच्या कार्यालयातील टेरेसवर पोहचले. त्यानंतर सीआरफच्या जवानांनी त्यांना तेथून बाजूला केले. राऊत कार्यालयाच्या टेरेसवर का गेले, यावर चर्चा सुरु झाली.
कारवाईला मी निधड्या छातीने सामोरे जायला तयार
याआधी संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, जी काही कारवाई होते ती होऊ द्या, मी घाबरत नाही. पक्ष माझ्या पाठीशी आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माझ्या पाठीशी आहेत, शिवसैनिक माझ्या पाठीशी आहेत. हा संजय राऊत कधी गुडग्यावर चालत नाही, सरपटत चालत नाही. या कारवाईला मी निधड्या छातीने सामोरे जायला तयार आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्रात भाजपाच्या विरोधातील लोकांच्या विरोधात ज्या काही कारवाया सुरु आहेत, त्याविरोधात लढण्यासाठी बळ मिळणार आहे. आमच्यासारखे जे लोक आहे जे न झुकता कारवाईला सामोरे जातात. काही झाले तरी मी शिवसेना सोडणार नाही, असे संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
(हेही वाचा देशमुख, मलिक, संजय राऊतांंना अडचणीत आणणारा PMLA कायदा आहे तरी काय?)
Join Our WhatsApp Community