राऊतांच्या अडचणीत वाढ! लैंगिक अत्याचार, मारण्याच्या धमकी प्रकरणी FIR दाखल

स्वप्ना पाटकर धमकी प्रकरणी संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल

155

पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील मुख्य साक्षीदार स्वप्ना पाटकर यांना लैंगिक अत्याचार आणि जीवे ठार मारण्याची धमकी आली होती. त्या विरोधात पाटकर यांनी केलेल्या तक्रारीनंतर वाकोला पोलीस ठाण्यात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – महाराष्ट्रात शिवसेनेचा अंत, देशात फक्त भाजपच राहणार – जेपी नड्डा)

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) राऊत यांना अटक केली आहे. त्याआधी पाटकर यांनी वाकोला पोलीस ठाण्यात राऊत यांच्याविरोधात जबाब नोंदवला होता. त्याआधारे राऊत यांच्या विरोधात भादंवि कलम ५०४, ५०६, ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

कोण आहेत स्वप्ना पाटकर

स्वप्ना पाटकर द रॉयल मराठा एंटरटेनमेंट या चित्रपट निर्मिती कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक, व्यावसायिक आणि मानसोपचार तज्ञ देखील आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत असलेल्या ‘बाळकडू’ या चित्रपटानंतर त्या प्रसिद्धीझोतात आल्या होत्या. २०१५ मध्ये हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. द रॉयल मराठा एंटरटेनमेंट या चित्रपट निर्मिती कंपनीच्या त्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकही आहेत.

(हेही वाचा -Patra Chawl Land Case: राऊतांविरूद्ध साक्ष देणाऱ्या स्वप्ना पाटकरांना जीवे मारण्याची धमकी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.