बॉलिवूडचा दबंग सलमान खानला काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. दरम्यान सलमान खानने शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता. आज, सोमवारी अखेर सलमानला शस्त्र परवाना मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे.
(हेही वाचा – जेपी नड्डांच्या ‘त्या’ वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण, म्हणाले…)
काय आहे प्रकरण
काही दिवसांपूर्वी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र आले होते. यानंतर सलमान खानने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली होती. यावेळी सलमान खानने शस्त्राच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. अखेर सलमानला आत्मसंरक्षणासाठी मुंबई पोलिसांकडून शस्त्र परवाना जारी करण्यात आला आहे.
Actor Salman Khan has been issued an Arms license after he applied for a weapon license for self-protection in the backdrop of threat letters that he received recently: Mumbai Police
(File Pic) pic.twitter.com/ggQQ2E7sLA
— ANI (@ANI) August 1, 2022
5 जून रोजी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र होते. वांद्रे येथील बँडस्टँड प्रोमेनेड येथील सलीम खान यांच्या गार्डला धमकीचे पत्र मिळाले होते. सलमानला धमकीच्या पत्रात सिद्धू मूसवालासारखंच तुझंही हाल केले जाईल, असं म्हटलं होतं. त्यामुळे सलमान आणि कुटुंबिंयांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, 1 वर्षांपूर्वी देखील सलमानने शस्त्र परवानासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यावेळी त्याला परवानगी देण्यात आली नव्हती. अखेर सोमवारी त्याला परवानगी देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community