पत्रा चाळीच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पामध्ये १ हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली संजय राऊतांना ईडीने अटक केली आहे. सोमवारी, १ ऑगस्ट रोजी संजय राऊतांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. त्यात न्यायालयाने राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली. न्यायालयात ईडीच्या वकिलाने कोणत्या आरोपाखाली संजय राऊतांना अटक केली, याचा तपशील दिला. तसेच संजय राऊतांना ईडीची कोठडी सुनावण्यात यावी, यासाठी आक्रमक युक्तीवाद केला, त्याची दखल घेत ईडी विशेष न्यायालयाने संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली.
काय म्हटले ईडीने न्यायालयात?
- न्यायालयात युक्तीवाद करताना ईडीने पत्राचाळ घोटाळ्यात प्रवीण राऊत यांच्या नावाचा उल्लेख केला. या घोटाळ्यात प्रवीण राऊत हा फक्त मध्यस्थ होता, असे म्हटले.
- प्रवीण राऊत हा पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्याला HDIL ग्रुपकडून ११२ कोटी रुपये मिळाले. त्यातील १ कोटी ६ लाख ४४ हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. त्या पैशातून अलिबाग येथे जमीन खरेदी केली.
- या घोटाळ्यात प्रवीण राऊत केवळ नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला. संजय राऊत हेच प्रवीण राऊत यांना समोर करून सर्व व्यवहार करत होते.
- या प्रकरणात संजय राऊत यांनी दोन साक्षीदारांना धमकावल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले. संजय राऊत यांना जर सोडले, तर ते पुन्हा तशा प्रकारचे कृत्य करु शकतात.
(हेही वाचा संजय राऊतांना मनी लाँड्रिंग अंतर्गत अटक, कोठडीतील मुक्काम वाढणार?)
Join Our WhatsApp Community