बनावट आधार कार्ड ओळखण्यासाठी राज्यव्यापी मोहीम राबवा – फडणवीस

170

बनावट आधार कार्ड ओळखण्यासाठी राज्यव्यापी पडताळणी मोहीम आखण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. यासाठी ब्लॉकसमधली गावे निवडावी, अशी सूचनाही त्यांनी केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते. राज्यातील प्रत्येक जिल्हा हा विशिष्ट उत्पादनासाठी ओळखला गेला पाहिजे. तो त्या जिल्ह्याचा ब्रँड व्हावा. तसेच त्याची निर्यात करणे, बाजारपेठ उपलब्ध करणे आदी बाबतीत नियोजन असले पाहिजे, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

(हेही वाचा – रेशन कार्ड धारकांना सरकारकडून दिलासा! आता FREE मिळणार LPG सिलिंडर)

प्रधानमंत्री मस्त्यसंपदा योजनेची अंमलबजावणी दक्षिण भारत व गुजरातमध्ये चांगल्या प्रकारे झाली आहे. त्याचप्रमाणे आयआयटीमधील कौशल्य विकासासंदर्भात कर्नाटकातही चांगले काम झालेले आहे. याठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांची पथके पाठवून अभ्यास करावा. तसेच ‘गोबर धन बायो सीएनजी’ योजना योग्य रितीने राबविण्यासाठी गोशाळा आणि बचत गटांना देखील सहभागी करुन घ्यावे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

क्षयरोगाचे उच्चाटन मोहीम राबवा

देशात मुंबईमध्ये क्षयरोगाचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. त्यामुळे क्षयरोगाचे उच्चाटन मोहीम राबविण्यासाठी प्रयत्न करावेत. या बैठकीत अमृत सरोवर अर्बन, जलधरोहर संरक्षण, तंत्र आणि वैद्यकीय शिक्षण मराठी भाषेमध्ये देण्याकरिता भाषा तज्ज्ञांचे मंडळ स्थापन करणे, जीएसटी अंमलबजावणी, जेम पोर्टलवरील खरेदी, असंघटीत कामगारांची नोंदणी, गोबर धन बायो सीएनजी, पीक विकेंद्रीकरण, प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना, राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम, आधार सेवा, क्रीडा उपक्रम तालुक्यापासून जिल्ह्यांपर्यंत आयोजित करणे, अंगणवाडी दत्तक घेणे अशा केंद्र सरकारच्या उपक्रमांवर देखील चर्चा झाली.

हर घर तिरंगा उपक्रम उत्साहाने राबवा

यावेळी मुख्यमंत्र्यांनी हर घर तिरंगा ही मोहिम राज्यामध्ये सर्व नागरिकांनी उत्साहाने राबवावी यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने चांगली जनजागृती करावी, अशी सूचना केली. यासाठी अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविण्याचे उद्दीष्ट असून यासाठी शाळा-शाळांमधून प्रभातफेऱ्या, अंगणवाडी, सहकार विभाग, पंचायतराज अशा विविध विभागांशी समन्वयाने ही मोहिम आपल्याला यशस्वी करायची आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.