हिंदू दलित कुटुंबियांवर होणारा अन्याय कदापि खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी दिला. मुंबई महापालिकेकडून मोहम्मद अली रोडवरील हिंदू कुटुंबाला जबरदस्तीने बेघर करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद, स्थानिक हिंदू समाज आणि मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार ॲड. मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली महापालिका वॉर्ड ऑफिसबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेवून संबंधित कुटुंबाला घराचा ताबा देण्याची मागणी करण्यात आली.
पीडितांचे घर सील करण्याचा निर्णय मागे घेतला
महापालिकेच्या प्रभाग ‘बी’ कार्यालयात झालेल्या बैठकीत पीडित कुटुंबाला घराचा ताबा देण्याचा निर्णय झाला असून प्रशासनाने पीडितांचे घर सील करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. या सर्व प्रकरणात पीडित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून त्यांना आपल्या हक्काच्या घरी पुन्हा परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आ. ॲड. मंगलप्रभात लोढा म्हणाले, ‘मुंबई असुरक्षिततेच्या उंबरठ्यावर’ असून जेव्हा-जेव्हा हिंदू धर्माला ज्या ज्या ठिकाणी त्रास दिला गेला किंवा विरोध केला गेला. तेव्हा तेव्हा त्याविरोधात आवाज उठवण्याचे काम आपण केले पाहिजे. हिंदू समाज जिवंत ठेवायचा असेल तर हिंदूंना जागृत राहावे लागेल. यासोबतच आपली संस्कृती वाचवण्यासाठी प्रत्येकाला लढाई लढावी लागणार आहे, असे मत आमदार ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी मांडले.
(हेही वाचा संजय राऊतांच्या अटकेविरोधात राज्यात मित्रपक्षांची मवाळ भूमिका; शिवसैनिकांचीही पाठ)
Join Our WhatsApp Community