MPSC चा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. MPSC च्या परीक्षा पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गट अ ते गट क च्या भरतीसाठी आता दोनच संयुक्त पूर्व परीक्षा घेतल्या जाणार आहेत. MPSC मार्फत शासनसेवेतील विविध पदांकरता राबवण्यात येणा-या भरती प्रक्रियेमुळे परीक्षांची संख्या वाढली आहे. त्यामुळे उमेदवार आणि प्रशासकीय यंत्रणेवर ताण येतो. सोबतच भरती प्रक्रियेत विलंब होतो, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. pic.twitter.com/m3wzUW4rGY
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) August 1, 2022
MPSC परीक्षेतील हे आहेत प्रमुख बदल
- आता मुख्य परीक्षेचे स्वरुप संपूर्णपणे लेखी असेल. परीक्षा एकूण 1750 गुणांची असेल. सध्या ही परीक्षा बहुतांशी बहुपर्यायी आहे. केवळ 100 गुण लेखी स्वरुपाचे आहेत.
- मुख्य परीक्षेत सध्या सगळ्यांनाच सारखेच सहा विषय आहेत. सध्या वैकल्पिक विषय नाही. आता याबरोबरच दिलेल्या 26 वैकल्पिक विषयांपैकी एक विषय निवडावा लागेल. त्या विषयाचे दोन पेपर असतील.
- आता निबंधाचा स्वतंत्र पेपर असेल. सध्या निबंधलेखन भाषांच्या पेपरातलाच एक भाग आहे.
- आता मुलाखत 275 गुणांची असेल, सध्या ती 100 गुणांची आहे.