आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री NTR यांच्या मुलीची आत्महत्या

171

NT Rama Rao’s Daughter Death दिवंगत अभिनेते, TDP पक्षाचे संस्थापक आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांची मुलगी उमा माहेश्वरी यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी उमा हैदराबाद येथील राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळल्या. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून, पुढील तपास सुरु आहे.

…म्हणून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले 

मिळालेल्या माहितीनुसार, उमा महेश्वरी यांना आरोग्याच्या काही समस्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. माहेश्वरी यांनी हैदराबादच्या जुबली हिल्स येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतला. जुबली हिल्सचे पोलीस अधिकारी राजशेखर रेड्डी यांनी सांगितले की, प्रकृती अस्वास्थामुळे उमा डिप्रेशनमध्ये होत्या आणि त्यामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊन उचलले.

( हेही वाचा: MPSC परीक्षा पद्धतीमध्ये महत्त्वाचा बदल; आता दोनच संयुक्त पूर्व परीक्षा घेतल्या जाणार )

एनटीआर यांच्या धाकट्या कन्या

एनटी रामाराव हे अभिनेता, चित्रपट निर्माते आणि राजकारणी होते. त्यांनी तीन टर्ममध्ये सात वर्षे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. 1996 मध्ये वयाच्या 72 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. एनटीआरला 12 आपत्ये होती, यात आठ मुले आणि चार मुली. उमा माहेश्वरी या सर्वात लहान होत्या. अभिनेता आणि माजी मंत्री एन हरिकृष्णासह एनटीआर यांच्या तीन मुलांचेही निधन झाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.