अल- जवाहिरी हा अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाल्यानंतर, आता अल- कायदाने (Al- Qaeda )नव्या म्होरक्याची निवड केली आहे. अल- कायदाने कुख्यात दहशतवादी सैफ अल- आदेल (Saif -Al- Adel) याची अल कायदाचा नवा म्होरक्या म्हणून निवड केली आहे. अमेरिकेच्या ड्रोनहल्ल्यात जवाहिरी मारला गेला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी मोहिमेतील हे अमेरिकेचे सर्वात मोठे यश आहे. आता अल- जवाहिरीच्या मृत्यूनंतर सैफ-अल- आदेल अल कायदाचा नवा म्होरक्या बनला आहे.
( हेही वाचा: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री NTR यांच्या मुलीची आत्महत्या )
कोण आहे सैफ अल आदेल?
- सैफ- अल- आदेलचा जन्म 11 एप्रिल 1960 मध्ये झाला.
- सैफ- अल- आदेल हा इजिप्तचा रहिवासी आहे.
- 1998 मध्ये नैरोबी येथील अमेरिकन दूतावास आणि दार-ए-सलाम येथे बाॅम्बस्फोट घडवून आणण्यात आदेलने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या हल्ल्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता.
- अमेरिकेकडून अल- आदेलवर एक कोटी डाॅलर्सचे बक्षीस ठेवण्यात आले होते.
- अल- आदेल अल- कायदाच्या मजलिस- ए- शूरा आणि लष्करी समितीचाही सदस्य आहे.
- सैफ- अल- आदेलने अल कायदाच्या दहशतवाद्यांना लष्करी आणि गुप्तचर प्रशिक्षण दिले आहे.
- ओसामा बिन लादेननंतर अल- आदेलची हंगामी नेता म्हणून निवड झाली होती. त्यानंतर अल- कायदाचा प्रमुख म्हणून अल- जवाहिरीची निवड झाली.
- आता अल- जवाहिरीच्या मृत्यूनंतर अल- आदेल अल- कायदाचा नवा म्होरक्या बनला आहे.