पुण्यातील हडपसर भागात एक उद्यान उभारण्यात आले होते. हे नामकरण नियमबाह्य असल्याची तक्रार स्वयंसेवी संघटनांनी केल्यामुळे हा उद्घाटन सोहळा वादाच्या भोवऱ्यात आला असून ऐनवेळी हा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती होती.
मात्र, पुण्यातील हडपसर परिसरात महापालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या उद्यानाला आता धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी दिली. तसेच, याबाबतची सर्व प्रशासकीय मान्यता आणि परगवानग्यांची प्रक्रियाही पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
(हेही वाचा – विकासकामांसाठी शासन पाठीशी, जनहिताची कामे थांबणार नाहीत – मुख्यमंत्री)
शिंदे समर्थक आणि माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी या उद्यानाला एकनाथ शिंदे यांचे नाव दिलं होतं. उद्यानाची जागा महापालिकेची असली तरी त्यासाठीचा खर्च आपण स्वतः केल्याचा दावा भानगिरे यांनी केला. त्यामुळेच, आपण हे नाव देत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, याबाबत माहिती मिळताच एकनाथ शिंदेंनी या उद्यानाला धर्मवीर आनंद दिघेंचं नाव देण्याचं सूचवलं. त्यानुसार, या उद्यानाला आनंद दिघेंचं नाव देण्यात येईल, यासंदर्भात माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे, असेही सामंत यांनी सांगितलं.
Join Our WhatsApp Community