घरबसल्या १० दिवसांत मिळणार Voter ID कार्ड, काय आहे प्रक्रिया

165

मतदान ओळखपत्र म्हणजेच Voter ID card तुम्हाला बनवायचं असेल तर यासाठी आता वारंवार कार्यालयाची पायरी चढण्याची गरज नाही. कित्येकदा अपुऱ्या कागदपत्रांमुळे मतदान ओळखपत्र दिले जात नाही. पण एक अशी सुविधा आहे, ज्याद्वारे तुम्ही मतदान ओळखपत्र घर बसल्या तयार करू शकतात. ज्यामध्ये तुम्हाला मतदान ओळखपत्र मिळवण्यासाठी तासन् तास रांगेत उभे रहावे लागणार नाही. तर आता १० दिवसांच्या आत घर बसल्या तुम्हाला तुमच मतदान ओळखपत्र मिळू शकणार आहे.

नवीन मतदान ओळखपत्र तयार करणं आता खूप सोपे झाले आहे. ते बनविण्यासाठी तुमच्या फक्त आवश्यक कागदपत्र हवीत. हे मिळवण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. तेथे गेल्यानंतर Voter ID Registration साठी अर्ज करू शकतात. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर सर्व प्रक्रिया उपलब्ध आहे. यामध्ये अनेक फॉर्म देखील उपलब्ध आहेत, जे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोडही करू शकतात.

(हेही वाचा – Voter ID: आता 17 व्या वर्षी बनवता येणार मतदार ओळखपत्र, निवडणूक आयोगाचा निर्णय)

असा करता येणार ऑनलाइन अर्ज

  • सर्वात आधी Election Commission Of India च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • National Voters Services Portal वर क्लिक करा
  • “Apple Online For Registration of New Voter” या पर्यायावर क्लिक करा.
  • फॉर्ममध्ये सर्व माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करा.
  • अखेरीस “Submit” बटणावर क्लिक करा.

सर्व माहिती भरून सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अधिकृत ई-मेल आयडीवर एक ईमेल येईल. यामध्ये एक लिंकही दिलेली असेल. या लिंकच्या माध्यमातून तुम्ही Voter ID Card Application Status ट्रॅक करू शकता. सर्व गोष्टी व्यवस्थित भरल्या असतील तर तुम्हाला तुमचं मतदान ओळखपत्र जास्तीत जास्त महिन्याभराच्या कालावधीत किंवा अवघ्या १० दिवसांत देण्यात येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.