सध्या महागाई खूप वाढली आहे. त्यातच आता CNG आणि PNG च्या दरातही वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री बसणार आहे. मध्यरात्रीपासून सीएनजीचे दर प्रतिकिलो 6 रुपयांनी वाढले, तर पीएनजीच्या दरामध्ये किलोमागे 4 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्रात सीएनजीचे दर 86 रुपये प्रतिकिलोवर, तर पीएनजीचे दर 52.50 रुपये प्रतिकिलो झाले आहेत.
महानगर गॅस लिमिटेडने जारी केलेल्या नव्या दरांमुळे, आता ग्राहकांना सीएनजी 86 रुपये प्रति किलोने तर पीएनजी 52.50 रुपयाने खरेदी करावा लागेल. देशांतर्गत गॅसच्या वाढलेल्या किमतीचा परिणाम एमजीएलच्या उत्पादन किमतीवर होत असून, त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे महानगर गॅस लिमिटेडने आपल्या निवेदनात म्हटले आहे. महानगर गॅस लिमिटेड (MGL) ही मुंबईत सीएनजी आणि पीएनजी पुरवठादार कंपनी म्हणून कार्यरत आहे.
( हेही वाचा: शिंदे गटातील आमदारांच्या गाड्या फोडण्याचे केले होते आवाहन; थोरात यांना पुणे पोलिसांकडून अटक )
Join Our WhatsApp Community