11th Admission : अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर; ‘या’ तारखेपर्यंत प्रवेश निश्चित करणे बंधनकारक

204

अकरावी प्रवेशाची पहिली याही जाहीर झाली असून मुंबई महानगरातील १ लाख ३९ हजार ६५२ विद्यार्थ्यांना पहिल्याच फेरीत महाविद्यालय मिळाले आहे. त्यातील ६१ हजार ६३४ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. विद्यार्थ्यांना मिळालेल गुण, प्रवेश पात्रता, महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम, कट ऑफ यावरून प्रवेश यादी जाहीर केली जाते.

( हेही वाचा : अमृत महोत्सवानिमित्त प्रवाशांसाठी ‘बेस्ट’ सवलती )

६ ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करणे बंधनकारक

पहिल्या फेरीत महाविद्यालय मिळालेल्या मुलांना ६ ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येईल. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे. प्रवेश निश्चित न केल्यास संबंधित विद्यार्थ्याला या प्रक्रियेतून बाहेर केले जाईल. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जारी केल्या जातील व त्यानंतर दुसरी फेरी आयोजित केली जाईल.

अकरावीच्या जागांमध्ये वाढ 

दरम्यान यंदा अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी १००८ महाविद्यालयांनी मुंबईत नोंदणी केली असून प्रवेश प्रक्रियेसाठी ३ लाथ ६९ हजार ९९५ जागा उपलब्ध केल्या जाणार आहेत. यामुळेच अकरावीच्या जागांमध्ये तब्बल ४९ हजारांची वाढ होणार आहे. पनवेल, भिवंडी, वसई या नवीन परिसरातील १७७ महिलयांच्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत समावेश करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना ४८ हजार ७० एवढ्या नव्या जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.