CWG 2022: भारताची पदकसंख्या १४ वर, लवप्रीत सिंगने वेटलिफ्टिंगमध्ये जिंकले कांस्य!

176

बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेच्या ६ व्या दिवशीही भारतीय खेळाडूंचे दमदार प्रदर्शन पाहायला मिळाले आहे. भारताच्या लवप्रीत सिंगने १०९ किलो वजनी गटात वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. त्याने स्नॅच राऊंडमध्ये १६३ किलो वजन उचलले तर क्लीन अँड जर्कच्या पहिल्याच प्रयत्नात त्याने १८५ किलो वजन उचलले. अशाप्रकारे त्याने सामन्यात एकूण ३५५ किलो वजन उचलले. वेटलिफ्टिंगमध्ये भारताला नववे पदक मिळाले. त्याबरोबर एकूण पदकांची संख्या १४ वर पोहोचली आहे.

(हेही वाचा – Alert! तुमच्या मोबाईलमध्ये हे 13 Apps आहेत, तर लगेच Delete करा; अन्यथा…)

मिळालेल्या माहितीनुसार, लवप्रीत सिंहने वेटलिफ्टिंगच्या १०९ किलो ग्राम वजनी गटात चांगली कामगिरी केली. स्नेचमध्ये पहिल्या प्रयत्नात त्याने १५७ किलो वजन उचलले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात १६१ आणि तिसऱ्या प्रयत्नात १६३ किलो वजन उचललं. तसेच क्लीन अँड जर्कमधील पहिल्या प्रयत्नात १८५ किलो ग्राम वजन उचलले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात १८९ आणि तिसऱ्या प्रयत्नात १९२ किलोग्राम उजन उचलले आहे.

राष्ट्रकुल २०२२ मध्ये एकूण १४ पदके

भारताने आतापर्यंत राष्ट्रकुल २०२२ मध्ये १४ पदके पटकावली असून सर्वाधिक पदक वेटलिफ्टिंगमध्ये मिळाली आहे. मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली सुवर्णपदक वेटलिफ्टिंग. महिला लॉन बॉल संघ आणि टेबल टेनिस पुरुष संघने सुवर्णपदक पटकावले आहे. सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ यांनी पाच रौप्य जिंकली आहे. गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह यांनी कांस्यपदक पटकावले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.