अमेरिकी संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीनंतर चीन आणि तैवानमध्ये तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, चीनने तैवान बेटाच्या सभोवताली सैनिकी युद्ध सरावाला सुरूवात केली आहे. चीनी सैन्याने संपूर्ण तैवानला ६ बाजूंनी नाकाबंदी केली असून चीन लष्कराकडून हवाई क्षेत्रात गोळीबार सुरू करण्यात आल्याची माहिती मिळतेय. मिळालेल्या माहितीनुसार, फ्लाइट ट्रॅकर्सवर दोन अज्ञात विमाने दिसू लागली आहेत आणि ते तैवानच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर फिरत असल्याचे समोर आले आहे.
(हेही वाचा – गोविंदा पथकांचा ‘विमा’ महापालिकांनी उतरवावा; ‘मनसे’ची मागणी)
केवळ तैवानच्या समुद्रातच नाही तर हवाई क्षेत्रात देखील चीनने आपल्या हवाई दलाला तैनात केले आहे. नॅन्सी पेलोसी यांच्या भेटीला चीनने विरोध केला होता. चीनच्या पीपल्स लिबरेशन अर्मीने तैवानच्या आसपासच्या परिसरात जल आणि हवाई क्षेत्रात थेट गोळीबार सुरू केला आहे.
तसेच रविवारी ७ ऑगस्टपर्यंत दुपारी १२ वाजता लष्करचा सराव संपणार असल्याचे सांगितले जात आहे. चीनने तैवानच्या हवाई क्षेत्रातून यात्री विमानांवर बंदी घातलीय. नॅन्सी पेलोसी यांचा दौरा संपत नाही तोवरच चीनने २७ फायटर जेट तैवानच्या हद्दीत दाखल झाले होते. यामुळे तैवान आणि चीनदरम्यान युद्धपरिस्थिती निर्माण होते आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र अमेरिकेने तैवानला पूर्ण पाठींबा दिली दिला आहे. तसेच अमेरिकी संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसिंच्या भेटीमुळे चीन आणि अमेरिका यांच्यात जुंपली आहे. चीनने नॅन्सी पेलोसिंनी तैवानला भेट देऊ नये, असे बजावले होते.
Join Our WhatsApp Community