महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने सूचना केली आहे की सध्या तरी कोणताही आदेश आम्ही देत नाही. परंतु, आता कुठलीही ठोस कारवाई करु नका. म्हणजेच पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय सध्या तरी न घेण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला केली आहे. तसेच, राज्याच्या सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी 8 ऑगस्टाला होणार आहे.
सर्वांच्या लिखित युक्तिवादाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ, याचिका मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्याबाबत सोमवारी निर्णय घेण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.
( हेही वाचा: आता घरभाड्यावरही भरावा लागणार १८ टक्के GST; यातील काही प्रमुख मुद्दे जाणून घ्या )
Join Our WhatsApp Community