Indian Railway: आता चालत्या ट्रेनमध्ये मोटरमनला डुलकी लागली तरी नो टेन्शन! कारण…

206

जगातील चौथ्या क्रमांकाचे आणि आशियातील दुसरे मोठे रेल्वे नेटवर्क म्हणजे भारतीय रेल्वे. भारतीय रेल्वे हे वाहतुकीचे असे साधन आहे, ज्यामध्ये गरिबांपासून श्रीमंत व्यक्ती देखील प्रवास करू शकतो. या प्रवासादरम्यान, संपुर्ण ट्रेन एका इंजिनद्वारे नियंत्रित केली जाते. यासह ट्रेनच्या इंजिनमध्ये एक ड्रायव्हर असतो, ज्याला लोको पायलट असेही म्हटले जाते. मात्र ट्रेनच्या या प्रवासात बाहेरील निसर्ग बघता बघता आपला डोळा लागतो तसा मोटरमनला देखील डुलकी लागली तर…असा प्रश्न कधी तुमच्या मनात आला आहे का? आणि जर ट्रेनच्या ड्रायव्हरला झोप लागली तर काय होईल? तुम्हाला माहिती आहे का..?

दोन्ही ड्रायव्हरला झोप लागली तर…

एकावेळी कित्येक प्रवासी एका ट्रेनमध्ये प्रवास करतात. अशा परिस्थितीत चालकाला झोप लागल्याने कोणताही अपघात होऊ नये म्हणून रेल्वेने ट्रेनमध्ये ड्रायव्हर व्यतिरिक्त एक असिस्टंट ड्रायव्हर देखील दिलेला असतो. ड्रायव्हर झोपला किंवा इतर काही प्रॉब्लेम असेल तर असिस्टंट ड्रायव्हर त्याला उठवतो. कोणतीही गंभीर समस्या उद्भवल्यास पुढील स्थानकावर कळवून ट्रेन थांबवली जाते. यानंतर स्टेशनवरून ट्रेनमध्ये नवीन ड्रायव्हर दिला जातो. मात्र त्याला पण झोप लागली तर…

… तर 17 सेकंदांनंतर ऑटोमेटिक ब्रेक लागतो

ट्रेनचे दोन्ही ड्रायव्हर झोपले तर काय होईल, असा प्रश्नही अनेकांच्या मनात आला असेल तर हे बातमी पूर्ण वाचा.. महत्त्वाचे म्हणजे असे होण्याची शक्यता खूपच कमी आहे. मात्र तरीही रेल्वेने यासाठी ट्रेनच्या इंजिनमध्ये ‘व्हिजिलन्स कंट्रोल डिव्हाईस’ बसवले आहे. ट्रेनच्या इंजिनमध्ये हे यंत्र बसवलेले आहे.  हे यंत्र अशी काळजी घेते की जर ड्रायव्हरने एक मिनिटही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही तर 17 सेकंदात ऑडिओ व्हिज्युअल इंडिकेशन येते. ड्रायव्हरला बटण दाबून ते स्वीकारावे लागते. जर ड्रायव्हरने या संकेताला प्रतिसाद दिला नाही तर 17 सेकंदांनंतर ऑटोमेटिक ब्रेक लावण्यात येतो.

(हेही वाचा – Indian Railways: ट्रेनमध्ये कोणी तुमची सीट बळकावली तर असा द्या दणका!)

ट्रेन चालवताना ड्रायव्हरला वारंवार वेग वाढवून हॉर्न वाजवावा लागतो. म्हणजेच ड्युटीवर असताना ड्रायव्हर पूर्णपणे सक्रिय राहतो. जर त्याने मिनिटभर प्रतिसाद दिला नाही तर रेल्वे हे ऑडिओ व्हिज्युअल संकेत पाठवते. ड्रायव्हरकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही, तेव्हा ट्रेन 1 किमी अंतरावर थांबते आणि ट्रेनमधील इतर रेल्वे कर्मचारी या प्रकरणाची दखल घेतात. यामुळे रेल्वेचे मोठे अपघात होण्यापासून टळतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.