मुंबईत 1400 कोटींचे मेफेड्रोन जप्त, पाच तस्करांना अटक

178

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने नालासोपारा भागातून ७०३ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जच्या मालाची किंमत सुमारे १४०० कोटी रूपये असल्याची माहिती मिळतेय. पोलिसांनी याप्रकरणी एका केमिकल इंजिनियरसह ५ जणांना अटक करण्यात आली असून त्यात एका महिलेचा समावेश आहे, अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी सेल डीसीपी दत्ता नलावडे यांनी दिली. मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

(हेही वाचा – Central Railway: ‘हे’ लोक करत आहेत मध्य रेल्वेला ‘श्रीमंत’!)

जप्त केलेल्या अंमली पदार्थाचे वजन ७०० किलोपेक्षा जास्त असून मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ पथकाने ही कारवाई केली आहे. ही खेप एका औषध कंपनीवर टाकलेल्या छाप्यात पकडण्यात आल्याचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी सांगितले. या औषध कारखान्यात मेफेड्रोन हे प्रतिबंधित औषध तयार केले जात असल्याची माहिती मिळाली, त्यानंतर हा छापा टाकत हे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरळी युनिटने मार्च महिन्यात गोवंडी शिवाजी नगर परिसरात केलेल्या कारवाईत दोघांना अटक करून ४ कोटी १४ लाख किंमतीचा एमडी (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू असताना जुलै महिन्यात एका महिलेला अटक करण्यात आली होती, तिच्याकडे कसून चौकशी केली असता तीने दिलेल्या माहितीवरून अंमली पदार्थ विरोधी पथकाने २ ऑगस्ट रोजी या प्रकरणातील चौथ्या आरोपीला अटक करण्यात आली होती.

अटक करण्यात आलेल्या चौथ्या आरोपीकडे कसून चौकशी केली असता तो एका व्यक्तीकडून एमडी खरेदी करून तो यापूर्वी अटक करण्यात आलेल्या तिघांना पुरवठा करीत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी याप्रकरणी रसायन शास्त्रातून ‘ऑर्गनिक केमिस्ट्री’चे शिक्षण घेतले असल्याचे चौकशीत समोर आले, त्याने वेगवेगळे केमिकल एकत्रित करून मेफेड्रोन हा अंमली पदार्थ तयार करण्याचे ज्ञान आत्मसात केले. या अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी त्याने सोशल मीडियाचा वापर करून सोशल मिडियावर मेफेड्रोन ची ऑर्डर घेऊन त्याचा पुरवठा मुंबई, ठाणे, रायगड, नवीमुंबई सह राज्यातील अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीला पुरवठा करीत होता.

या छापेमारेदरम्यान, मुंबईतील चार आणि नालासोपारा येथील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. नुकतेच मुंबईत पोलिसांनी पकडलेल्या अंमली पदार्थांची ही एक मोठी खेप असल्याचे त्यांनी सांगितले. मेफेड्रोन हे ड्रग्ज म्याव म्याव किंवा एमडी म्हणून देखील ओळखले जाते. ही एक कृत्रिम पावडर असून नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायद्यान्वये हे प्रतिबंधित अंमली पदार्थ मानले जाते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.