Terror funding case: डी गँगशी संबंधित परवेझ जुबेरला अटक, ATS ची मोठी कारवाई

185

दाऊद इब्राहिम गँगशी संबंधित एका व्यक्तीला एटीएसच्या पथकाने अटक केली आहे. या व्यक्तीचे नाव परवेझ जुबेर नामक व्यक्तीला पथकाने नुकतेच ताब्यात घेतले आहे. टेरर फंडिंगमध्ये तो सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसने युएपीए कायद्याच्या अंतर्गत ही कारवाई केली आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी आणि मोस्ट वाँटेड अंडर वर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिमच्या संपर्कात परवेझ जुबेरला असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

अनिस इब्राहिम याच्यासोबतच पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांशी संबंधित व्यक्तीच्याही संपर्कात परवेझ जुबेर होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. याप्रकरणी हाती आलेल्या माहितीनुसार, परवेझ जुबेर हा दहशतवाद संबंधित कारवायांसाठी निधी पुरवण्याच्या नेटवर्कमध्ये सहभागी असल्याचा पोलिसांकडून संशय व्यक्त केला जात आहे.

(हेही वाचा – MSRTC: राज्य सरकारने वेतनासाठी एसटी महामंडळाला १०० कोटींचा निधी मंजूर)

गेल्या काही दिवसांपासून पोलीस त्याच्या संपर्कात होते. परंतु परवेझ जुबेर पोलिसांच्या हाती लागत नव्हता. वेगवेगळी रूपं घेऊन तो अनेक ठिकाणी वास्तव्य करत होता. या सगळ्या प्रकारानंतर मोठा सापळा रचत अखेर एटीएसच्या पथकाने परवेझ जुबेरला अटक केली असून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकऱणी एटीएस पुढील तपास करत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.