शाळा महाविद्यालये सुरु झाल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांची शालेय पुस्तके खरेदीची लगबग वाढली आहे. हेच हेरुन आता सायबर गुन्हेगारांनी पुस्तके विकत घेणा-या विद्यार्थ्यांना लक्ष्य केले आहे. पुस्तकविक्री करणा-या राज्यातील नामांकित दुकानांच्या नावाने बनावट संकेतस्थळ तयार करुन आर्थिक फसवणूक केली जात आहे.
अनेक पुस्तकालयांत पुस्तके उपलब्ध नसल्याने, पालक- विद्यार्थी ऑनलाइन पुस्तके खरेदी करतात. त्याचाच हे सायबर गुन्हेगार गैरफायदा घेत आहेत. राज्यातील जवळपास 2 हजार 600 पेक्षा जास्त जणांची ऑनलाइन पुस्तक खरेदी करताना फसवणूक झाली असून, महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
( हेही वाचा: कर्ज पुन्हा महागलं; रेपो रेटमध्ये 50 बेसिस पाॅईंटची वाढ )
अशी होते फसवणूक
ऑनलाइन खरेदी करताना, पुस्तके उपलब्ध असलेल्या दुकानांची यादी इंटरनेटवर शोधली जात असताना, हवी असलेली पुस्तके बनावट संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचा दावा सायबर गुन्हेगार करतात. पुस्तकाच्या 10 टक्के रक्कम भरण्यास सांगितले जाते. त्यासाठी क्युआर कोड पाठवण्यात येतो. तो कोड स्कॅन केला की, काही कळायच्या आत खात्यातून मोठी रक्कम सायबर गुन्हेगारांच्या खात्यात वळती होते.
Join Our WhatsApp Community