शिंदे फडणवीस सरकारचा शुक्रवारी 5 ऑगस्टला मंत्रीमंडळ विस्तार होणार होता. परंतु आता मिळालेल्या माहितीनुसार, हा विस्तार पुढे ढकलण्यात आला आहे. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सुरु असलेल्या न्यायालयाच्या निर्णयानंतर, मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्यायालयाच्या सुनावणीनंतर खातेवाटप होणार असल्याचे दिसते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी रात्री उशिरा दिल्लीवरुन मुंबईत दाखल झाले. दिल्लीत मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. दिल्लीच्या वा-या वाढल्या म्हणजे मंत्रिमंडळाच्या याद्या निश्चित होत असतात, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली आहे. तर दुसरीकडे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी 15 ऑगस्टच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार निश्चित होणार असल्याचे सांगितले आहे.
( हेही वाचा: गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी मनसेकडून मोफत बस )
….म्हणून मुख्यमंत्र्यांना विश्रांतीचा सल्ला
दीपक केसरकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांची नियमित आरोग्य तपासणी सुरु होती. ते आजारी नाहीत. मात्र त्यांनी स्वत:ची फार दगदग करुन घेतली आहे, असे केसरकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांना थकव्यामुळे विश्रांतीचा सल्ला डाॅक्टरांनी दिल्याची माहिती समोर आली असून, केसरकरांनी या थकव्यामागील कारण हे अपुरी झोप असल्याचे सांगितले.